पुण्याचा बिहार होतोय का ? गोळीबाराने पुणे हादरले; रात्रीही अन् सकाळीही गोळीबार..!

दुसरा प्रकार मंगळवारी दुपारी सनसिटी रस्त्यावर घडला. बांधकाम व्यावसायिक व ओळखीच्या तरुणासोबत व्हॉट्सअप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरून वाद झाल्यानंतर रागातून गोळीबार केला. या घटनेत रमेश राठोड (वय ३६) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संतोष पवार (वय ३५) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

  पुणे, गोळीबाराच्या घटनांनी पुणे पुन्हा हादरले असून, शहरात कल्याणीनगर परिसरात रात्री किरकोळ कारणावरून गोळीबार झाला अन् नंतर सकाळी लागलीच सिंहगड रोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मित्रांमधील वादातून एकाने तरुणावर गोळीबार केला. त्याने तीन गोळ्या तरुणाच्या दिशेने झाडल्या. यात तरुणाच्या पायाला गोळी लागली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे कोयत्यानंतर आता गोळीबार पेटणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  – कल्याणीनगरला रात्री तर सनसिटी रस्त्यावर सकाळी गोळीबार
  कल्याणीनगर परिसरात शेकोटीकरून बसलेल्या तरुणांनी केवळ एका व्यावसायिकाला ‘कहा के हो’ असे विचारल्याने त्या व्यावसायिकाने हवेत गोळीबार केला. सोमवारी रात्री साडे आकराच्या सुमारास घडला. या गोळीबारानंतर चिडलेल्या तरुणांनी व्यावसायिकाची कार फोडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अमित सत्यपाल सिंग (वय ३१, रा. कल्याणीनगर) या व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार मारहाण व चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर, नवनाथ गलांडे यांच्या तक्रारीनुसार खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद केला आहे.

  अमित यांचा आईस्क्रीमचा व्यवसाय आहे. हडपसरला फॅक्टरी असून त्यांच्या ८ ते ९ फ्रॅन्चायजीस आहेत. दरम्यान, ते सोमवारी रात्री ११ वाजता जेवण करुन बाहेर फेरफटका मारण्यास गेले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला काही तरुण शेकोटी करुन बसलेले होते. सिंग हेही तेथे गेले. तेव्हा तरुणांनी त्यांना ‘कहा के हो’, अशी विचारणा केली. ते काही न बोलताच तेथून परतले. पण, कार घेऊन पुन्हा तरुणांकडे गेले. तरुणांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. कार थांबवून ते खाली आल्यानंतर तरुणांनी त्यांना मारहाणीचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. असे पोलिसांनी सांगितले. तरीही तरुणांमध्ये व त्यांच्यात झटापट झाली. झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली. तर तरुणांनी गाडीच्या काचा फोडली असे तक्रारीत म्हटले आहे.

  – दोन्ही घटनांमध्ये परवानाधारक पिस्तूलातून गोळीबार…
  नवनाथ गलांडे यांच्या तक्रारीनुसार ते व त्यांचे मित्र शेकोटी करुन बसले होते. त्यावेळी अमित दारूच्या नशेत तेथे आले. आम्ही त्यांना ‘भय्या कहा के हो’ अशी विचारणा केली. त्याचा त्यांना राग आला. ते निघून गेले. पण, ते पुन्हा कार घेऊन आले. त्यांनी विचारणा करणार्‍याला तरुणाला बोलावले आणि त्याच्यावर पिस्तुल रोखले. तेव्हा घाबरुन त्यांनी त्यांचा हाथ धरला. त्यामुळे पिस्तुलातून वर हवेत गोळी झाडली गेली. त्यानंतर ते गाडी सोडून पळून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यासह येरवडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

  दुसरा प्रकार मंगळवारी दुपारी सनसिटी रस्त्यावर घडला. बांधकाम व्यावसायिक व ओळखीच्या तरुणासोबत व्हॉट्सअप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरून वाद झाल्यानंतर रागातून गोळीबार केला. या घटनेत रमेश राठोड (वय ३६) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संतोष पवार (वय ३५) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सनसिटी रस्त्यावर एका गॅरेजवर रमेश व संतोष आणि त्यांचे मित्र भेटलेले होते. व्हॉट्सअप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगमुळे या दोघांत वाद झाले. संतोष पवारबाबत एक पोस्ट टाकण्यात आली होती. त्यावरून वाद झाला. वादात रमेश राठोड हेही सहभागी झाल्यानंतर राग अनावर झालेल्या संतोष पवारने पिस्तूलातून गोळीबार केला. तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी रमेश यांच्या पायाला लागली आहे.
  दरम्यान, संतोष यांच्याकडे पिस्तूलाचा परवाना आहे. ते एका मोक्काच्या गुन्ह्यातील तक्रारदार असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देखील आहे. त्यांच्या संरक्षणार्थ एक पोलीस त्यांच्यासोबत असतो. त्यातच त्यांनी गोळीबार केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.