Salim Kutta Death Fact Check
Salim Kutta Death Fact Check

  Salim Kutta Death Fact Check : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असणारा सलीम कुत्ता याची अधिवेशासह राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सलीम कुत्ताच्या एका पार्टीत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर सहभागी असल्याचा आरोप झाला आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
  1998 मध्ये सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा
  दरम्यान, सलीम कुत्ता हा जिवंत आहे की, मृत याबाबतच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. 1998 मध्ये सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. तर ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनीदेखील कुत्ताचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.
  सलीम कुत्ता जिवंत की मृत?
  मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांच्या मते आमदार कैलास गोरंट्याल यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. 1998 मध्ये जो व्यक्ती मारला गेला होता, त्याचे नाव सलीम कुर्ला असे होते. सलीम कुर्ला हा मुंबई बॉम्बब्लॉस्टचा आरोपी होता. सलीम कुर्ला हा एजंट म्हणून काम करीत होता.
  1998 मध्ये सलीम कुर्ला याला मारले
  तो खोटे पासपोर्ट बनवायचा. बॉम्बस्फोटातील आरोपीचे पासपोर्ट सलीम कुर्ला याने तयार केले होते. 1998 मध्ये त्याला छोटा राजनच्या गँगने मारले होते. सलीम कुत्ता जिवंत आहे. सध्या तो येरवाडा जेलमध्ये आहे. 1998 मध्ये सलीम कुर्ला याला मारले होते.
  2016 पासून पुण्यातील येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये
  सलीम कुत्ता हा 2016 पासून पुण्यातील येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. त्याआधी तो नाशिक कारागृहात होता. तिथून तो पॅरोलवर सुटला होता. डान्स करीत असतानाचा व्हिडीओ तो नाशिक कारागृहातून पॅरोलवर सुटला असतानाचा आहे, याबबातचे वृत्त एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिले होते.
  गृहमंत्र्यांनी या सलीम कुत्ताप्रकरणी सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी
  मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राइट हॅण्ड समजला जाणारा सलिम कुत्ता याची १९९८मध्ये रुग्णालयातच हत्या झाली होती. पण, आमदार नितेश राणे या सलीम कुत्तावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करीत आहे. गृहमंत्र्यांनी या सलीम कुत्ताप्रकरणी सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.