“राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का?, फडणवीसांचे हात दगडाखाली असल्यानं हतबल”; फडणवीस नाकाने कांदे सोलताहेत…राऊतांचे शरसंधान

निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणांचा सिलसिला विरोधकांच्या मागे सुरु आहे, राहुल कूल यांचे भ्रष्टाचाराचे ५०० कोटीचे प्रकरण दिले आहे, त्यांना कोण वाचवत आहे, फडणवीस त्यांना वाचवत आहेत. यावर ते शांत कसे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहे, मख्यमंत्री आहे, खोक्यांना एकत्र ठेवण्याचं काम मिंधे गटातील शिंदे करत आहे.

मुंबई– या राज्यात सध्या काहीही घडू शकते. कायद्याचे राज्य साफ कोसळले आहे. ते असेच कोसळत राहिले तर महाराष्ट्र कोसळेल व महाराष्ट्राच्या प्रतिमेस तडेच तडे जातील. राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे. ‘लाच’ देणे व घेणे यात गैर वाटत नाही अशी महाराष्ट्राची प्रतिमा झाली आहे व त्यामुळेच हे राज्य भविष्यात संतसज्जनांचे राहील काय, असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी रस्त्यांवर कांदा ओतून भाजप सरकारचा निषेध केला, पण नाकाने कांदे (Onion) सोलण्याचे या सरकारचे काम सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यांत भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज उघड होऊनही उपमुख्यमंत्री फडणवीस फक्त ‘आधीच्या सरकारने काय केले?’ हीच रेकॉर्ड वाजवून गुळगुळीत करीत आहेत. अशी टिका आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावर केली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था आहे का?,

दरम्यान, लोकं आंदोलनं, संप करताहेत, लोकं रस्त्यावर उतरलेत. लोकांमध्ये संताप आहे, राज्यातील अस्थिरता फडणवीसांनी पाहावी, फडणवीसांचे हात दगडाखाली अडकलेत, रोज कायदा व सुव्यवस्था याचा मुडदा पडत आहे, रोज खंडणी, दरोडा, ब्लकमेकिंग होत आहे. पण गृहमंत्री फडणवीस काहीही करु शकत नाहीत. तर फडणवीस विरोधकांवर निशाना साधत आहे. मविआच्या काळात काय झाले असं ते म्हणताहेत, अहो तुमचा काळ बघा ना, असं राऊतांनी फडणवीसांवर निशाना साधला.

फडणवीस हतबल झालेत

भाजपाला कुटुंबात घुसण्याचे प्रकार आहे, आमच्यात नाही. जर गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ब्लकमेकिंग प्रकरण गेलं असेल तर हे गंभीर आहे, हा तुमचा कौटुंबिक प्रकार व प्रश्न आहे, याचा पोलिसांनी तपास करावा, महाराष्ट्रात असे प्रकार घडू नये, पोलिसाची भीती राहिली नाही. या प्रकरात विरोधकांकडे बोट दाखवण्याची गरज नाही, नाकाने कांदे सुलण्याची गरज काय? म्हणून फडणवीस हतबल झालेत, काय होतास तु काय झालास तु, असं राऊत म्हणाले. राज्याचा कारभार हे मुख्यमंत्री चालवत नसून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, असा घणाघात राऊतांनी केला.

…मग फडणवीस गप्प का?

निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणांचा सिलसिला विरोधकांच्या मागे सुरु आहे, राहुल कूल यांचे भ्रष्टाचाराचे ५०० कोटीचे प्रकरण दिले आहे, त्यांना कोण वाचवत आहे, फडणवीस त्यांना वाचवत आहेत. यावर ते शांत कसे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहे, मख्यमंत्री आहे, खोक्यांना एकत्र ठेवण्याचं काम मिंधे गटातील शिंदे करत आहे. सरकार म्हणजे कोण, या राज्यात सरकार अस्तित्वात नाही, लाल वादळ मुंबईच्या वेशीवर आलंय, त्यांची जरी ठिणगी पडली तर काय होऊल विचार करा, उद्धव ठाकरे यांच्या सभा होतील, मी शेतकऱ्यांची भेट घेणार आहे, असं राऊत म्हणाले.