Chain bomb plot in Pune city
Chain bomb plot in Pune city

इसिस (इस्लामीक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरीया) या बंदी घातलेल्या संघटनेची विचारधारा पसरविण्यास निधी जमविणार्‍या तसेच दहशतवादी हल्ला करण्याच्या दृष्टीने कट करण्यात सहभागी असलेल्या इसिसच्या पुणे मोड्युलशी संबंधीत ७ दहशतवाद्यांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

    पुणे : इसिस (इस्लामीक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरीया) या बंदी घातलेल्या संघटनेची विचारधारा पसरविण्यास निधी जमविणार्‍या तसेच दहशतवादी हल्ला करण्याच्या दृष्टीने कट करण्यात सहभागी असलेल्या इसिसच्या पुणे मोड्युलशी संबंधीत ७ दहशतवाद्यांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

    मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर, अब्दुल हमिद खान (रा. रतलाम मध्यप्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा),  समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (रा. तिघेही रा. पडघा, ठाणे) अशी आरोपपत्र दाखल केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्यावर बेकायदेशिर हालचाली प्रतिबंधक कायदा (युएपीए), एक्स्लोसीव्ह सबस्टन्स अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट तसेच विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.

    पुणे पोलिसांनी जुलै महिन्यात कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, आणि मोहम्मद यांना अटक केली होती. ते रहात असलेल्या कोढव्यातील घरझडती दरम्यान आलम हा फरार झाला होता. दरम्यान दोघांकडील तपासात त्यांचा बंदी घातलेल्या अलसुफा संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले. तर त्यांचा राजस्थानातील चित्तोरगड येथील स्फोटके बाळगल्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. ते इसिसचे सदस्य असून त्यांचा लोकांमध्ये दहशत माजविण्याचा व भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहचविण्याचा उद्देश होता, असे तपासात समोर आले होते. एनआयएने पुणे मोड्युल उघडकरत त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शनही समोर आणले. परदेशात बसून दशतवादी कृत्य सुरू असल्याचा कट उघड झाले.

    अतिरेकी विचारसरणीचा प्रचारचे गुंता गुंतीचे नेटवर्क उघड झाले. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी इसिचा म्होरक्या खलिफा याच्याशी एक निष्ठ रहाण्याची शपथ घेतली होती. याच दरम्यान ते आयईएफ बनविण्यात गुंतल्याचे आढळून आले. भारतीय भुमीवर दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा हेतू होता. आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, तेलंगणासह इतर राज्यात इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रसार करण्यासाठी रेकी केल्याचे आढळून आले आहे.