
कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील प्रा. एन. के. हिप्परकर यांनी माळावर इस्त्राइल बाजरीचा नवा प्रयोग करत एक वेगळा आदर्श तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समोर ठेवत इस्त्राइल बाजरीचे पीक पिकवली आहे.
जत : कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील प्रा. एन. के. हिप्परकर यांनी माळावर इस्त्राइल बाजरीचा नवा प्रयोग करत एक वेगळा आदर्श तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समोर ठेवत इस्त्राइल बाजरीचे पीक पिकवली आहे.
पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने तालुक्यातील बराच युवा वर्गाने शेतीकडे पाठ फिरवलाचे दिसुत येत आहे. परंतु वाळेखिंडी (लोणारवाडी) येथील प्रा. हिप्परकर हे बार्शी येथील महाविद्यालयामध्ये संख्याशास्त्राचे शिक्षक म्हणून नोकरी करत होते. संख्याशास्त्र विषयाचे प्राध्यापक असल्यामुळे अनेक देशाचे दौरे त्यांनी केले आहेत. ज्या देशात व राज्यात गेले तेथील नाविण्यपूर्ण गोष्टी जाणून घेऊन स्थावर अभ्यास करणे व अंमलात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तसेच त्या भागातील कोणत्या पिकांना मागणी जास्त आहे ते पीक आपल्या भागात उत्पन्न घेता येईल का? सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतात हा त्यांचा छंद आहे. सन २०१७ रोजी ते सेवानिवृत्त झाले. सुरुवातीपासूनच त्यांना शेतीची आवड होती. त्यांनी आपल्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग राबवले आहेत.
कमी पाऊस असल्याने केली बाजरीची पेरणी
वाळेखिंडी या भागात कमी पाऊस असल्याने प्रा. एन. के. हिप्परकर यांनी इस्त्राइल बाजरी या पिकावर अभ्यास केला. आपल्या भागातील बाजरी पेक्षा जास्त उत्पन्न देणारे पीक आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये एक एकर इस्त्राइल बाजरीची पेरणी केली. पाच हजार रुपये या दराने त्यांनी एक किलो बियाणे खरेदी केली. त्या बाजरीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या बाजरी पेक्षा वेगळी बाजरी आहे.
उत्पादनातून शेतकऱ्यांना मोठा नफा
आपल्या भागातील बाजरीच्या कणसाची लांबी नऊ इंच से एक फुटापर्यंत असते पण या बाजरीच्या कणसाची लांबी तीन से साडेतीन फूट लांबीची असून येणारे पीक ही तीन पटीने वाढून येते. म्हणून भागातील शेतकिऱ्यांनी इस्त्राइल बाजरीचे उत्पन्न घ्यावे. या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. ही बाजरी पाहण्यासाठी तालुक्यातील व बाहेरील गावातील लोकांनी मोठी गर्दी केली आहे.