aaditya thackeray

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Security) यांना झेड सुरक्षा असल्याने पोलीस तसंच सुरक्षारक्षकांना पोलिसांची गाडी असणं अपेक्षित असताना त्यांना खासगी गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

    रत्नागिरी : शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा(Aaditya Thackeray) आज रत्नागिरी दौरा सुरु झाला आहे.आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेचा (Nishtha Yatra) तिसरा टप्पा आजपासून सुरु होत आहे. या रत्नागिरी दौऱ्यामध्ये (Ratnagiri) सुरक्षेत तडजोड झाल्याची माहिती मिळाली आहे. कारण आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची (Aaditya Thackeray Security) सुरक्षा असूनही, त्यांच्या सुरक्षाकवचामध्ये खासगी गाड्या दिसून आल्या. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये झालेल्या तडजोडीवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

    आदित्य ठाकरे हे दुपारी १२.४० च्या दरम्यान रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र त्यांना झेड दर्जाची सुरक्षा असूनही, तशा पद्धतीचं सुरक्षा कवच दिसलं नाही. त्यांच्या ताफ्यात खासगी गाड्या दाखल झाल्या

    आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा असल्याने पोलीस तसंच सुरक्षारक्षकांना पोलिसांची गाडी असणं अपेक्षित असताना त्यांना खासगी गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या यापूर्वीच्या दौऱ्यात पोलिसांचा फौजफाटा होता, परंतु रत्नागिरी दौऱ्यात सुरक्षारक्षकांना खासगी गाड्या देऊन त्यावर पोलीस असं लेबल लावण्यात आलं आहे.

    सुरक्षेत तडजोड होण्यावरून आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. माझ्यासाठी शिवसैनिक पुरेसे आहेत,” असं त्यांनी म्हटलं आहे.