
सध्या फोडाफोडीचे राजकारण होत आहे. भाजपात जोरदार इंनकमिंग सुरु आहे, भाजपाच्य गळाला अनेक पक्षातील नेते लागलेत, त्यामुळं भाजपा फोडाफोडीचे राजकारण करत आहे का, असा प्रश्न विचारला असता, कोणाला फोडोफोडीचे राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावे, आम्ही आमची भूमिका घ्यायची ती घेऊ, असं शरद पवार म्हणाले.
अमरावती– राज्याच्या राजकारणात (Political) अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. दरम्यान, जसा राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल जवळ येत आहे, तसेच भाजपा-शिंदे आणि मविआ असा सामना तसेच कुरघोडीचे राजकारण बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानं चर्चांना उधाण आलं होत. त्यामुळं अजित पवार भाजपात प्रवेश करणार का? अजित पवार पक्षात नाराज असल्याचं बोललं जातंय. अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपामध्ये जाणार अशी सुद्धा चर्चा सुरु होती. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर अजित पवारांनी मरेपर्यंत मी राष्ट्रवादीच राहणार असं म्हणत अजित पवारांनी भाजपा प्रवेशावर पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, आता आगामी काळातील आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठे व सूचक वक्तव्य केलं आहे.
…तर ते आत्ताच सांगता येणार नाही
सध्या शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर आहेत, काल (रविवारी) अमरावती येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत महात्मा फुले अग्रीक्लचर फोरमच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी पदवीधर संघटना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी येत्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. भविष्यातील मविआतील आघाडीबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही”, असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षर शरद पवार यांनी केले आहे.
फोडोफोडीचे राजकारण
सध्या फोडाफोडीचे राजकारण होत आहे. भाजपात जोरदार इंनकमिंग सुरु आहे, भाजपाच्य गळाला अनेक पक्षातील नेते लागलेत, त्यामुळं भाजपा फोडाफोडीचे राजकारण करत आहे का, असा प्रश्न विचारला असता, कोणाला फोडोफोडीचे राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावे, आम्ही आमची भूमिका घ्यायची ती घेऊ, असं शरद पवार म्हणाले. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहेत, असं पवारांनी सांगितले. जेपीसी नव्हे तर त्याऐवजी सर्वेाच्च न्यायालयाची समिती प्रभावी राहील असं पवार म्हणाले. जेपीसी समितीत 21 जणांनी समिती असणार आहे. यात 15 सत्ताधारी तर 6 विरोधी पक्षाचे खासदार असतील. त्यामुळे या समितीचा निर्णय हा सत्ताधारी यांच्या बाजूने येईल, असं पवार म्हणाले.