Aditya Thackeray
Aditya Thackeray

आपल्यासोबत ४९आमदार असल्याचा दावा शिंदे करत आहेत. रात्री उशिरा आणखी काही आमदारही गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. एकूणच शिंदे यांची शिवसेना मजबूत होत आहे. बहुधा शिंदे आज भाजपसोबतच्या युतीबाबत काही मोठी घोषणा करण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

  मुंबई – महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Ekanath shinde)  यांनी स्वतःला विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषित केले आहे. त्यांनी तशा आशयाचे उपसभापती नरहरी झिरवाल यांना एक पत्र पाठवले असून, त्यात त्यांच्या समर्थनार्थ ३७ आमदारांच्या सह्या आहेत. शिंदे यांनी या पत्राची प्रत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधान परिषदेचे सचिव राजेंद्र भागवत यांनाही पाठवली आहे.

  आपल्यासोबत ४९आमदार असल्याचा दावा शिंदे करत आहेत. रात्री उशिरा आणखी काही आमदारही गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. एकूणच शिंदे यांची शिवसेना मजबूत होत आहे. बहुधा शिंदे आज भाजपसोबतच्या युतीबाबत काही मोठी घोषणा करण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

  अपडेट्स:

  • शिंदेसेनेच्या आकड्यात वाढ. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार दिलीप लांडे पोहचले. लांडे यांचे उत्साहात स्वागत.
  • शिवसेना भवनातील बैठकीला मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहणार गैरहजर. आदित्य ठाकरे करणार मार्गदर्शन.
  • मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची खलबते सुरू आहेत. पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असून, आगामी रणनीतीवर चर्चा सुरू असल्याचे समजते.