burkha wearing girl
 (Representational image)

परिसरात मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा पसरल्याने हा तरूण या टोळीचा सदस्य असल्याचे पानटपरी चालकाला वाटले. त्यानंतर त्याने एकच आरडाओरडा केल्याने या तरुणाची जमावाने येथेच्छ धुलाई केली.

    नाशिक – बुरखा घालून प्रेयसीला भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रेमवेड्याला जमावाने मुले पळवणारा समजून बेदम मारहाण केल्याची घटना नाशकात घडली आहे. हा तरुण आपल्याच भागातील आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून आला होता. त्याची चलाखी एका पानटपरी चालकाच्या लक्षात आली आणि व्हायचे तेच झाले.

    परिसरात मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा पसरल्याने हा तरूण या टोळीचा सदस्य असल्याचे पानटपरी चालकाला वाटले. त्यानंतर त्याने एकच आरडाओरडा केल्याने या तरुणाची जमावाने येथेच्छ धुलाई केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा परिसरात राहणारा एक तरुण नेहमी त्याच्या प्रियेसीला भेटण्यासाठी बुरखा घालून येत होता. दुपारी नेहमी प्रमाणे तो बुरखा घालून तरुणीच्या घरा जवळ आला. मात्र तरुणीच्या घराच्या जवळ गर्दी झाल्याने हा तरुण एका पानटपरीच्या जवळ उभा राहिला. बराच वेळ एक महिला बुरख्यात उभी असल्याने पानटपरी चालकाने या महिलेला विचारले. महिलेने काही उत्तर दिले नाही. पानटपरी चालकाचे लक्ष महिलेच्या पायाकडे गेले. पायात जेन्टस बुट असल्याचे पानटपरी वाल्याने पाहिले. त्याने ओळखीच्या नागरिकास सांगीतले. त्या नागरिकाने बुरखा घातलेल्या तरूणाला नाव विचारले असता त्याने बोलण्यास नकार दिला. नागरिकांना हा तरूण चोर असल्याचा संशय आला व त्यांनी मुलाला मारहाण केली.