माझ्या डोळ्यासमोरच माझ्या मुलानं मुख्यमंत्री व्हावं वाटतं ; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली भावना

डेंग्यूच्या आजारपणामुळे अजित पवार काटेवाडीत मतदानसाठी येणार नाहीत. तर आज सकाळीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी ग्रामपंचायतसाठी मतदान केले.

    बारामती: माझा मुलगा अजितने माझ्या डोळ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.

    काटेवाडी ग्रामपंचायत च्या निवडणुकीसाठी आशाताई पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सोळा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यावेळी आशाताई पवार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाल्या,, ‘माझ्यासमोरच मुलाने मुख्यमंत्री व्हाव, असं मला वाटतं. लोक दादांवर प्रेम करतात. पण पुढचं काय सांगता येत नाही, अजितदादांवर लोकांचा खूप प्रेम आहे. पण पुढचं काय सांगावं. सर्वांना वाटतं अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे. माझंही आता वय झालं आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यांसमोरच दादांनी मुख्यमंत्री व्हावं’, अशी इच्छा आशाताई पवार यांनी बोलून दाखवली.

    डेंग्यूच्या आजारपणामुळे अजित पवार काटेवाडीत मतदानसाठी येणार नाहीत. तर आज सकाळीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी ग्रामपंचायतसाठी मतदान केले. मात्र आजारपणामुळे अजित पवार मतदानासाठी उपस्थित राहिले नाहीत.