खासगी ट्रॅव्हल्समध्येही विमानासारखी सूचना देणं बंधनकारक, राज्य परिवहन विभागाचा निर्णय!

ज्या पद्धतीने विमानात एअर होस्टेस आप्तकालीन परिस्थितीमध्ये काळजी घेण्याची सुचना देतात त्याप्रमाणे आाता खासगी बसमध्येही प्रवाशांना सूचना देणं आता बंधनकारक असेल.

    आपण विमान प्रवास करत असताना नेहमी एक एअर होस्टेस प्रवाशांना आप्तकालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाची काळजी याबाबत सूचन देताना पाहतो. आप्तकालीन परिस्थितीत काय करायल हवे याबद्दल ते प्रवाशांना निर्देश देतात. आता अशाच सूचना आपल्याला येत्या काळात खासगी बस प्रवासातही ऐकायला मिळू शकतात. विमानाप्रमाणे खासगी बसेसमध्येही (Instruction For Private Bus) सुरक्षिततेच्या सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य परिवहन विभागाने (Maharashtra State Transport) या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    नागपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, खासगी बसमध्येही आपात्कालीन परिस्थितीत काय करावं याची सूचना देणं आता बंधनकारक करण्यात येणार आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता परिवहन विभागाने काही निर्णय घेतले आहे. यामध्ये बसच्या दर्शनी भागात बस चालकाचा फोटो, मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक, बसच्या फिटनेस संदर्भातली माहिती स्टिकर स्वरूपात लावणे बंधनकारक राहणार आहे. एवढंच नाही तर विमान प्रवासात ज्या पद्धतीने एअर होस्टेस आपात्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे याची सूचना प्रवाशांना देते. तशाच पद्धतीच्या सूचना बस प्रवास सुरू होण्याआधी प्रवाशांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

    बसच्या दुर्घटनेत वाढ झाल्याने निर्णय

    गेल्या काही दिवसात राज्यभरात अनेक खासगी बस दुर्घटना झाल्या. दुर्घटनेच्या वेळी आप्तकालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय खबरदारी घ्यावी याची माहिती नसल्यामुळे अनेकदा ते दुर्घटनेला बळी पडतात. त्यामुळे या दुर्घटना टाळत याव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.