इतिहासाची मोडतोड करणे योग्य नाही, संजय राऊतांकडून शिवसेनेची भूमिका स्पष्ट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांसंबंधी केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली, असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर भाजपने राहुल गांधींसह काँग्रेसशी हातमिळवणी करणाऱ्या शिवसेनेलाही लक्ष्य केले होते. त्यावर संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

    नवी दिल्ली – हिंदुत्व (Hindutva) किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar)प्रकरणी शिवसेना (Shivsena) कधीही तडजोड (Compromise) करणार नाही. या मुद्द्यावर काँग्रेसशी (Congress) नेहमीच मतभेद असतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांसंबंधी केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली, असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर भाजपने राहुल गांधींसह काँग्रेसशी हातमिळवणी करणाऱ्या शिवसेनेलाही लक्ष्य केले होते. त्यावर संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

    सावरकर १० वर्ष अंदमान जेलमध्ये होते. ज्यांनी कारावास भोगला, त्यांनाच हा अनुभव काय असतो हे कळू शकते. सावरकर, नेहरु किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस असो, पुन्हा मागे जाऊन इतिहासाची मोडतोड करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत संजय राऊतांनी मांडले. आम्ही राहुल गांधींबाबत काही चर्चा करणार नाही. आम्ही त्यांच्याशी सहमत नाही. पण युतीमध्ये तडजोड करावी लागते. युती ही नेहमीच तडजोडीतून केलेली असते, असेही संजय राऊत म्हणाले.

    युती कायम ठेवण्यासाठी आम्हाला काँग्रेससह राहणे गरजेचे आहे. आम्ही नेहमीच सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत असतो. प्रत्येक मुद्द्यावर आमचे एकमत नसेल, पण हिंदुत्व किंवा सावरकरांच्या मुद्द्यावर आम्ही तडजोड करणार नाही, असेही राऊत यांनी सांगितले.