मोठी कारवाई! उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याला कर्ज दिल्याचा आरोप असणाऱ्या या व्यक्तीच्या घरावर IT चा छापा

आयकर विभागाकडून आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुष्पक बुलियन केसमध्ये नाव समोर आलेल्या नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. नंदकिशोर हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध ईडी आणि आयकर विभागाकडून सुरु आहे.

    मुंबई : आयकर विभागाकडून आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुष्पक बुलियन केसमध्ये नाव समोर आलेल्या नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. नंदकिशोर हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध ईडी आणि आयकर विभागाकडून सुरु आहे. ईडीकडून तपास सुरुच होता. पण आता आयकर विभागाकडूनही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संबंधित शेल कंपन्यांवर आयकर विभागाने आज छापे टाकले आहेत. ईडीकडून सुरु असलेल्या पुष्पक बुलियन केसमध्ये नंदकिशोर चतुर्वेदी यांचं नाव समोर आलं होतं. चतुर्वेदी सध्या फरार आहेत.

    नंदकिशोर चतुर्वेदी हे उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील रवहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ते पेशाने सीए आहेत. ते हमसफर डिलर्स नावाची बनावट कंपनी चालवत असल्याचा आरोप आहे. याच कंपनीच्या नावे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना कर्ज दिल्याचा आरोप आहे.