मागच्या मुख्यमंत्र्यात हिंमत नव्हती, सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले, मागचं सरकार वर्क फ्रॉम जेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सरकारला सहा महिने झाले. या काळात सरकार काय असते हे जनतेला कळाले. आधीचे सरकार अडीच वर्षे बंदीस्त होते. ते दाराआड होते. ते केवळ फेसबूकवर लाईव्ह होते तर जनतेत डेड होते. सरकारचे काहीच दिसत नव्हते.

  नागपूर – वर्क फ्राॅम होम आपण बघितले परंतु त्यानंतर वर्क फ्राॅम जेल हा प्रकार महाराष्ट्राला दिसला तो त्या सरकारमध्ये होता. मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा मुख्यमंत्र्यात हिंमत नव्हती की, त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले, तेव्हा जेलमधील मंत्र्याचा कारभार बंद झाला. मागचे सरकार अनैतिक सरकार होते. आपल्या पाठीत खंजीर खूपसून ते सरकार आले होते, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे आज केला. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीची घोषणा आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी डाॅ. रणजित पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी घोषित केले. यावेळी त्यांनी संबोधन केले.

  फेसबूकवर लाईव्ह जनतेत डेड
  देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सरकारला सहा महिने झाले. या काळात सरकार काय असते हे जनतेला कळाले. आधीचे सरकार अडीच वर्षे बंदीस्त होते. ते दाराआड होते. ते केवळ फेसबूकवर लाईव्ह होते तर जनतेत डेड होते. सरकारचे काहीच दिसत नव्हते. दिसायची ती वसूली. वसूलीचे नवीन उच्चांक गेल्या सरकारने गाठले. मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत जेलमध्ये गेले.

  वर्क फ्राॅम जेल हा प्रकार महाराष्ट्राला दिसला
  देवेंद्र फडणवीस म्हणाले, वर्क फ्राॅम होम आपण बघितले परंतु त्यानंतर वर्क फ्राॅम जेल हा प्रकार महाराष्ट्राला जेल दिसला तो त्या सरकारमध्ये होता. मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा मुख्यमंत्र्यात हिंमत नव्हती की, त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले तेव्हा जेलमधील मंत्र्याचा कारभार बंद झाला.

  मागचे सरकार अनैतिक
  देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागचे सरकार अनैतिक होते. जनादेशाचा विश्वासघात व आपल्या पाठीत खंजीर खूपसून ते सरकार आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक मोठा उठाव केला. तो फक्त हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठीच होता. त्यामुळे ते ठाकरे सरकारमधून बाहेर पडले व आमदार, खासदारांनाही सोबत घेत सरकार स्थापन केले.

  विदर्भात आणले उद्योग

  देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण अनेक योजना विदर्भात आणल्या. विदर्भात उद्योग आणले. परंतु मागील सरकारच्या अडीच वर्षांत आम्ही त्रास झाल्याने उद्योग विदर्भात आले नाही. आज सर्व विदर्भातील लोकांना उद्योजकांना मी आश्वासन दिले की, आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू.