Chief Minister Uddhav Thackeray's first blow

काँग्रेससोबतर असलो, तरी ह्रदयातलं हिंदुत्व सोडलेलं नाही. मी विधानसभेत बोललोय. सत्ता असो वा नसो, परवा नाही. आमचं हिंदुत्व तकलादू नाही, ते खरं आहे. हिंदुत्व सोडायला काय धोतर वाटलं का, कधी नेसलं, कधी सोडलं. सोडायला लाज तुम्हाला नसेल वाटत, पण हिंदुत्व नेसण्याची, सोडण्याची गोष्ट नाही. असे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    मुंबई – आम्ही काँग्रेससोबत गेलो ते उघड गेलो. तुमच्यासारखं सकाळचा शपथविधी नाही केला आम्ही. तुम्ही केलं तर पवित्र आणि आम्ही केलं तर अपवित्र. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर दगा, तुम्ही सकाळची शपथ घेतली ते काय केलं. तो तुमचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून गुणगान केलं असतं असं वाटतं का तुम्हाला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray on BJP ) यांनी भाजपला असा टोला लगावला

    काँग्रेससोबतर असलो, तरी ह्रदयातलं हिंदुत्व सोडलेलं नाही. मी विधानसभेत बोललोय. सत्ता असो वा नसो, परवा नाही. आमचं हिंदुत्व तकलादू नाही, ते खरं आहे. हिंदुत्व सोडायला काय धोतर वाटलं का, कधी नेसलं, कधी सोडलं. सोडायला लाज तुम्हाला नसेल वाटत, पण हिंदुत्व नेसण्याची, सोडण्याची गोष्ट नाही. असे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    आज मुंबईतील बीकेसी ( Uddhav Thackeray news mumbai bkc ) येथील शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून ( CM Uddhav Thackeray on hindutva in mumbai ) भाजपला धारेवर धरले.