Rejuvenation of crops with the arrival of rains! 23.8 ml of rain in last 24 hours

7 ते 11 ऑगस्ट दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

    काही दिवसापासून उंसत घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. 2-3 दिवसापासून सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. आता 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे वादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 8 ते 10 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    मुंबईसाठी 8, 9 आणि 10 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी

    बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 48 तासात तीव्र होत असून, डिप्रेशनमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असल्यानं राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईसाठी 8, 9 आणि 10 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. दरम्यान, सध्या कोकणात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. विविध ठिकाणी पावसामुळं जनजीव विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळं वाहतुकीवनर मोठा परिणाम झाला आहे. गुहागर तालुक्यात मोठा पाऊस झाल्यामुळं अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे.