Jaadu Ki Zappi' by Udayanaraje to Shivendrasimharaje; Satara district should lead the birthday wishes

  सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात दोन ध्रुवावर दोघे आपण अशी राजकीय समीकरणे रंगवणारे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये राजकारण विरहित बंधुभाव शनिवारी पाहायला मिळाला . खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट सुरुची येथे येऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . तसेच त्यांनी महाराष्ट्राचे व जिल्ह्याचे नेतृत्व करावे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या . उदयनराजे यांच्या शुभेच्छांमुळे मला दहा हत्तींचे बळ आल्याची भावना यावेळी शिवेंद्रसिंह राजे यांनी व्यक्त केली
  वाढदिवसानिमित्त एकत्र
  सातारा शहराच्या राजकारणामध्ये एकमेकांवर राजकारणाच्या निमित्ताने भरपूर तोंडसुख घेणारे दोन्ही राजघराण्यातील सदस्य आज मात्र आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आले. खासदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उदयनराजे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासमवेत लोकसभा संयोजक सुनील काटकर उपस्थित होते.
  राजकीय अर्थ काढू नये
  उदयराजे भोसले यांनी यावेळी यांनी लहानपणीच्या आठवणी जागवल्या यांच्यासाठी लहानपणी मी खूप मार खाल्ला आहे असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये, राजकारण वेगळे असते आणि घरातली नाती वेगळी असतात असे उदयनराजे यांनी आधीच स्पष्ट केले आपल्याला उदंड आयुष्य व यश मिळो तसेच आपल्या राजकीय वाटचालीमध्ये आपण जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अशा अपेक्षा व्यक्त करत उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंह राजे यांना जादू की झप्पी दिली.
  उदयनराजे राजकीय बेरीज करून माघारी
  या वेळी बोलताना शिवेंद्रसिंह राजे म्हणाले राजघराण्यातील जेष्ठ सदस्य या नात्याने बंधू उदयनराजे यांच्या शुभेच्छांमुळे मला दहा हत्तींचे बळ आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी कायम त्यांच्या बरोबर आहे. केंद्रातील वरिष्ठ कार्यकारिणीने सातारा लोकसभेच्या जागेबाबत काय निर्णय घेतला आहे हे मला ठाऊक नाही,पण सातारा जावली मतदारसंघात रमणारा मी कायम त्यांच्या बरोबर आहे त्यांनी तिकिटासंदर्भात प्रयत्न केले आहेत त्यांची खात्री आहे अशा शब्दात शिवेंद्रसिंह राजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांना एकत्र बघून साताऱ्यात मनोमिलनाचे वारे वाहू लागले आहे अशा राजकीय चर्चांना सुरुवात झाली . निरोप घेताना उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या गालाचे चुंबन घेतले तसेच त्यांची दाढी मला टोचते असा विनोद केल्याने पुन्हा एकदा हशा पिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन उदयनराजे राजकीय बेरीज करून माघारी परतले
  साताऱ्याने अनुभवला बाबा राजेंच्या वाढदिवसाचा जल्लोष
   आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस सातारा शहरात धुमधडाक्यात साजरा झाला साताऱ्यात रात्री गोलबाग परिसरामध्ये मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती तेथे शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या समवेत हजारो कार्यकर्ते एकत्र जमून त्यांनी शिवेंद्रराजे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी जेसीबीच्या ट्रॉलर मधून हजारो फुलांची उधळण करण्यात आली तसेच उदयनराजे समर्थकांच्या वतीने रक्तदान शिबिर लकी ड्रॉ स्पर्धा आनंद भवन येथे मिस्टानाचे वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर शिवेंद्रसिंह राजे हे सकाळीच शेंद्रे येथील कारखाना कार्यस्थळावर तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन तेथील पदाधिकाऱ्यांना भेटले स्वर्गीय अभयसिंह उर्फ दादासाहेब महाराज यांच्या शिल्पाकृती पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले संध्याकाळी सहाच्या नंतर येथील कलाम आणि महाविद्यालयाच्या मैदानावर शुभेच्छांचा स्वीकार करत शिवेंद्रसिंह राजे यांनी सातारकरांशी संवाद साधला.