pune Thirteenth Om Dalvi Memorial
Thirteenth Om Dalvi Memorial

  पुणे : ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ. नितू मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज (18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात जय पवार याने तर, मुलींच्या गटात ध्रुवी आद्यंतया यांनी विजेतेपद पटकावले. तर, दुहेरीत सार्थ बनसोडे व अर्णव बनसोडे यांनी, तर धनश्री पाटील व पार्थसारथी मुंढे यांनी विजेतेपद संपादन केले.
  महाराष्ट्र पोलिस (एमटी जिमखाना) टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात मुख्य ड्रॉच्या अंतिम फेरीत मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित जय पवारने चौथ्या मानांकित अनमोल नागपुरेचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दुहेरीत सार्थ बनसोडे व अर्णव बनसोडे या जोडीने ओंकार शिंदे व अश्विन नरसिंघानी या चौथ्या मानांकित जोडीचा 6-4, 6-7(5), 15-13 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
  मुलींच्या गटात अंतिम लढतीत पुण्याच्या ध्रुवी आद्यंतयाने स्वानिका रॉयचा 6-4, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीत धनश्री पाटीलने पार्थसारथी मुंढेच्या साथीत सान्वी मिश्रा व धन्वी काळे यांचा 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
  स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ.नितु मांडके चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक मंदार मांडके, ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे चेअरमन विक्रम बोके, ट्रस्टी उमेश दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मारुती राउत, सुपरवायझर श्रीराम गोखले, निहारिका गोरे आदी मान्यवर उपस्थित होते
  निकाल : अंतिम फेरी : मुले :जय पवार (महा) (3) वि.वि.अनमोल नागपुरे(महा)(4)6-2, 6-0;
  मुली: ध्रुवी आद्यंतया (महा) वि.वि.स्वानिका रॉय (महा) 6-4, 6-3;
  दुहेरी: मुले : अंतिम फेरी : सार्थ बनसोडे/अर्णव बनसोडे वि.वि.ओंकार शिंदे/अश्विन नरसिंघानी (4)6-4, 6-7(5), 15-13;
  मुली : धनश्री पाटील/पार्थसारथी मुंढे वि.वि.सान्वी मिश्रा/धन्वी काळे 6-3, 6-4.