वैभव गायकवाडला जेल की बेल? उद्या कोर्टाचा निकाल

२ फेब्रुवारी रोजी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात द्वारली येथील जागेच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदावर गोळीबार केला होता.

    कल्याण-अमजद खान : गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र यांना जेल होणार की बेल? त्यांच्यावर अटक पूर्व अंतरिम जामीन अर्जावर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. उद्या अर्जावर निकला येऊ शकतो. मात्र वैभव गायकवाड यांच्या जामीन अर्जावर तीन तास सुनावणी झाली. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी बाजू जोरदारपणे मांडत युक्तीवाद केला. मात्र वैभव गायकवाड यांच्यावर केलेले आरोप आणि सीसीटीव्ही फूटेज यांच्या कशी तफावत आहे. हा मुद्दा गायकवाड यांच्या वकिलांनी उपस्थित केला.

    २ फेब्रुवारी रोजी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात द्वारली येथील जागेच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदावर गोळीबार केला होता. या प्रकरणी आमदार गायकवाड यांच्या सह पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना प्रथम पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. ते आता तळाेजा कारागृहात आहे. दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेले आमदार गायकवाड यांचे सूपूत्र वैभव हे घटनेच्या दिवसापासून फरार आहे. वैभव गायकवाड यांच्या अटक पूर्व जामीनीकरीता कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मंगळवारी दुपारी वैभव गायकवाड यांच्या वतीने वकिल सुदीप पासबोला, अनिकेत निकम आणि उमर काझी यांनी युक्तावाद केला. तर महेश गायकवाड यांनी वकील कासम शेख यांनी बाजू मांडली.

    अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. इनामदार यांच्यासमोर युक्तीवाद केला गेला. वैभव गायकवाड यांच्या वकिलांनी आपला युक्तीवाद हे सांगण्याचा प्रयत्न केला की, या प्रकरणात वैभव गायकवाड यांच्या विरोधात केलेले आरोप खोटे आहे. त्यांच्या विरोधात लावलेली कलमे चुकीची आहेत. गणपत गायकवाड यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी गोळीबार केला. वैभव गायकवाड त्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांला या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वकिल अनिकेत निकम यांनी युक्तीवादा दरम्यान सांगितले की, कशा प्रकारे वैभव गायकवाड यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा आणि सीसीटीव्ही फूटेज यात तफावत आहे. वैभव गायकवाड यांनी गोळीबार घटनेच्या आधी महेश आणि राहूल यांना शिविगाळ केली. सीसीटीव्हीत दिसून येत नाही. घटना घडल्यानंतर वैभव गायकवाड हे आत आले. हे पण सीसीटीव्हीत दिसून येत नाही. तसेच जेव्हा आरोपी संदीप सरवणकर यांनी पोलिसांच्या केबीनमध्ये येऊन खुर्ची उचलली. त्यावेळीही सीसीटीव्हीत वैभव दिसून येत नाही. वैभव यांच्या विरोधात केलेला एफआयआर हा खोटा आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला. वैभव यांना जामीन देण्यात यावा अशी न्यायालयाकडे विनंती केली.

    दुसरीकडे महेश गायकवाड यांचे वकील कासम शेख त्यांच्यासह वकिलांनी देखील वैभव गायकवाड यांना जामीन देऊ नये यासाठी बाजू मांडली. सांगण्याचा प्रयत्न केला गेला की, गोळीबार प्रकरणात आरोपींना माहिती होते की, पोलीस केबीनमध्ये महेश यांच्याकडे त्याची लायसन्स गन आणि सुरक्षेचा पोलीस नसणार आहे. त्यासाठी ही जागा निवडली गेली होती. कशा प्रकारे वैभव गायकवाड याचा सहभाग आहे. हे सांगण्याचा प्रयत्न कासम शेख यांच्याकडून करण्यात आला. दोन्ही बाजूच्या वकीलांनी आपल्या बाजूने निकाल द्यावा याकरीता उच्च न्यायालयातील यापूर्वीच्या खटल्यातील निकालांचे दाखले दिले.