जालन्यातील काँग्रेसचे आ. राजेश राठोड यांच्यासोबत घातपात? कारला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न, राठोड बचावले

राजपूत भामटा समाजाच्या आरक्षणाबाबत पाठपुरावा केल्याने आपल्याला यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. तसेच यात तुम्ही पडू नका अशी धमकी आली होती. आमदार राठोड हे मुंबईहून कारने येत असताना त्यांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला.

    मुंबई – राजकीय क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार राजेश राठोड यांच्यासोबत घातपात होण्याची शक्यता होती किंवा त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता. पण ते या घातपातात सुखरूप बचावले आहेत. राजपूत भामटा समाजाच्या आरक्षणाबाबत पाठपुरावा केल्याने आपल्याला यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. त्यामुळे आपण संरक्षणाची मागणी केली होती, असं राठोड यांनी म्हटलं आहे. हा प्रकारही त्याच कटाचा भाग असल्याचा राठोड यांना संशय आहे. दरम्यान, आमदार राठोड हे मुंबईहून कारने येत असताना त्यांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला. भांडूपजवळील पिंपळनेरजवळ गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजता हा प्रकार घडला.

    नेमकं काय घडलं?

    दरम्यान, राजपूत भामटा समाजाच्या आरक्षणाबाबत पाठपुरावा केल्याने आपल्याला यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. तसेच यात तुम्ही पडू नका अशी धमकी आली होती. आमदार राठोड हे मुंबईहून कारने येत असताना त्यांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला. भांडूपजवळील पिंपळनेरजवळ गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजता हा प्रकार घडला. एका ट्रकने ओव्हरटेक करत पाठीमागील चाकांमध्ये त्यांच्या कारला धडक देण्याचा प्रयत्न केला. परंतु, राठोड यांच्या चालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला घेतल्याने दुर्घटना टळली. दरम्यान, या घटनेची माहिती राठोड यांनी पोलिसांना दिली आहे. त्यानंतर ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकाराच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. हा घातपात असल्याचं राठोड यांनी म्हटले आहे.

    प्रवास करतेवेळी मागे व पुढे दोन्ही बाजूंनी मोकळा रस्ता असताना ट्रकचालकाने थेट आमच्या गाडीवर ट्रक आणला. जाणूनबुजून हा प्रकार केल्याची जाणीव झाली. यापूर्वीही मला धमक्या आलेल्या आहेत. मला मारण्याचा प्रयत्न होता, अशी प्रतिक्रिया राजेश राठोड यांनी दिली आहे.