धनगर आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन ; पाच दिवसापासून गणेश केसकर यांचे उपोषण

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोणंद मधील गणेश केसकर नगरपंचायतीसमोर गेली चार दिवस झाले उपोषणाला बसले आहेत, मात्र या उपोषणाची दखल अजूनही शासनाकडून घेतली जात नसल्याने  खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने निरा दत्तघाट येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

    लोणंद : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोणंद मधील गणेश केसकर नगरपंचायतीसमोर गेली चार दिवस झाले उपोषणाला बसले आहेत, मात्र या उपोषणाची दखल अजूनही शासनाकडून घेतली जात नसल्याने  खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने निरा दत्तघाट येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

    शासनाच्या गलथान कारभाराचा निषेध करीत, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, या घोषणा देत अनेक युवक निरा नदीपात्रात जलसमाधीसाठी उतरले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. सुनिल शेळके, माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके, नगरसेवक सागर शेळके, सत्वशील शेळके, खंडाळा तालुका आरपीआय अध्यक्ष पवण सुर्यवंशी, खेडचे सरपंच गणेश धायगुडे, खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाचे युवक उपास्थित होते. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

    प्रशासनाचे दुर्लक्ष
    बावकलवाडी (ता. खंडाळा) येथील आर्किटेक्ट असणारे गणेश केसकर धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेली चार दिवस लोणंद नगरपंचायतीसमोर आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाचा पाचवा दिवस अाहे. प्रशासन याकडे लक्ष न िदल्याने खंडाळा तालुका धनगर समाजाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले.