एक ट्रक पुढे थांबला होता त्यामागोमाग कार जाऊन थांबली पण मागून येणाऱ्या ट्रकने कारला दिली धडक, कारचं झालं सँडविच, जळगाव येथील अपघातात वृद्धेचा मृत्यू

एका विचित्र अपघातात कार दोन ट्रकमध्ये चिरडली गेली. या भीषण अपघातात कारमध्ये असलेल्या यमुनाबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी गव्हाणे (वय ३०) आणि चालक कृष्णा गव्हाणे (वय ६६) हेही जखमी झाले आहेत. तर अल्पवयीन मुलगी गौरी गव्हाणे (वय ९) ही किरकोळ जखमी होऊन बचावली.

    चाळीसगाव : तालुक्यातील गौताळा कन्नड घाटात (Gautala Kannada Ghat) दोन ट्रकच्या मधोमध कारची धडक होऊन कारचं सँडविच झालेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. कारमधील अन्य दोन जण जखमी झाले. सुदैवाने कारमधील ९ वर्षांची मुलगी सुखरूप बचावली. यमुनाबाई पवार (Yamunabai Pawar) असे मृत महिलेचे नाव असून त्या औरंगाबाद येथील रहिवासी आहेत.

    सरदार पॉईंट येथे ट्रक (GJ 36 V 7852) थांबला. ट्रक (TN 36 AW 3999) कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून जाणारी मारुती बलेनो कार (MH 20 EE 5470) ट्रकच्या मागे थांबली. समोरून ट्रक पाहून मागून कारला धडक दिली. ती सरळ समोर उभ्या असलेल्या ट्रकखाली गेली आणि कारचं दोन ट्रकच्या मध्ये सँडविच झालं. या कारमधून औरंगाबाद येथील एक कुटुंब प्रवास करत होते. जे धुळ्याच्या दिशेने जात होतं. एका विचित्र अपघातात कार दोन ट्रकमध्ये चिरडली गेली. या भीषण अपघातात कारमध्ये असलेल्या यमुनाबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी गव्हाणे (वय ३०) आणि चालक कृष्णा गव्हाणे (वय ६६) हेही जखमी झाले आहेत. तर अल्पवयीन मुलगी गौरी गव्हाणे (वय ९) ही किरकोळ जखमी होऊन बचावली. दरम्यान, पाठीमागून कारला धडक देणाऱ्या ट्रकचा चालक घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शोध घेत आहेत.

    महामार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रुपाली पाटील, कॉन्स्टेबल योगेश बेलदार, वीरेंद्रसिंग शिसोदे, धनंजय सोनवणे, इशांत तडवी यांनी क्रेनच्या सहाय्याने कारमध्ये अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.