sushma andhare

आज मुक्ताईनगर (Muktainagar) येथे होणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या सभेवर जळगाव जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते समोरासमोर येऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने अंधारे यांची सभा तर दुसरीकडे शिंदे गटाच्या महाआरतीच्या कार्यक्रमालादेखील परवानगी नाकारली आहे.

    जळगाव : उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्ताने सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या सभेचं आयोजन जळगावमध्ये करण्यात आलं आहे. यादरम्यान धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याबद्दल युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांना प्रशासनाकडून जिल्हा बंदी करण्यात आली आहे. आज मुक्ताईनगर (Muktainagar) येथे होणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या सभेवरही जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.  सुषमा अंधारे यांची सभा रद्द झाल्याच्या प्रशासनाच्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे.

    दरम्यान कालच प्रशासनाने युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना भाषणबंदी तसेच जिल्हा बंदी केली होती. आता पुन्हा सुषमा अंधारे यांच्या सभेला बंदी घातली आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे.

    मुक्ताईनगरात महाआरतीच्या कार्यक्रमाला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. सुषमा अंधारे यांची सभा आणि महाआरतीचा कार्यक्रम यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते समोरासमोर येऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने अंधारे यांची सभा तर दुसरीकडे शिंदे गटाच्या महाआरतीच्या कार्यक्रमाला सुद्धा परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते कार्यक्रम करण्यावर ठाम आहेत.