जळगाव जिल्हा नियोजन समिती बैठक: खडसे-महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी

या बैठकीत एकनाथ खडसे यांनी काही सवाल उपस्थित केले. त्याला उत्तर देताना महाजन व खडसे (Khadse-Mahajan) यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी औषधांसाठी निधी खर्च करण्याची गरज काय? असा प्रश्न एकनाथ खडसे ((Eknath Khadse)) यांनी विचारला. यावर उत्तर देताना गिरीष महाजन म्हणाले की, निधीचा पैसा तुमच्या घरातून जातो का? यावर एकनाथ खडसे यांना संतापले, आणि त्यांना निधीत वायफळ खर्च होत असल्याचा आरोप केला.

    जळगाव – राज्याच्या राजकारणात काही जिल्ह्यात राजकीय नेत्यांचे विळ्या भोपळ्याचे संबंध आहेत. अगदी कट्टर विरोधी नेते ऐकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसतात. या नेत्यांमध्ये कधीच चांगले संबंध दिसले नाहीत. फक्त यांच्यामध्ये कटुता आणि राजकीय वैर दिसते आहे. त्यापैकी एक म्हणजे मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) आणि माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे. (Eknath Khadse) दरम्यान, आज जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे (jalgaon planing committe meeting) आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मंत्री गिरीष महाजन व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहयला मिळाले.

    दरम्यान, या बैठकीत एकनाथ खडसे यांनी काही सवाल उपस्थित केले. त्याला उत्तर देताना महाजन व खडसे (Khadse-Mahajan) यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी औषधांसाठी निधी खर्च करण्याची गरज काय? असा प्रश्न एकनाथ खडसे ((Eknath Khadse)) यांनी विचारला. यावर उत्तर देताना गिरीष महाजन म्हणाले की, निधीचा पैसा तुमच्या घरातून जातो का? यावर एकनाथ खडसे यांना संतापले, आणि त्यांना निधीत वायफळ खर्च होत असल्याचा आरोप केला. यादरम्यान, दोघामध्ये शाब्दिक चकमक झाल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, (Gulabrao Patil) जळगाव जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.