जळगाव दूध संघ निवडणूक : नाथाभाऊंनी पहिली बाजी मारल्याने राष्ट्रवादीत आनंद, आ. खडसे समर्थक बढे बिनविरोध

आज छाननीच्या नंतर दुध संघातील लढतींचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले आहे. आता माघारीच्या कालावधीत काही उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. यानंतरच खरेच चित्र स्पष्ट होणार आहे.

    जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon District Milk Sangha Elections) आज छाननी नंतर रावेरमधून (Raver) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या समर्थकाचा बिनविरोध विजय झाला आहे.

    जळगाव जिल्हा सहकारी दुध संघाच्या निवडणुकीसाठी आज छाननीचा शेवटचा दिवस होता (Last Day Of Scrutiny). यातून विविध मतदारसंघासाठींच्या लढती स्पष्ट झालेल्या आहेत. यात रावेर मतदारसंघातून जगदीश लहू बढे (Jagdish Lahu Badhe) यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांनी निवड निश्‍चित झाली आहे. ते आमदार एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक (Supporter) असून ते आधीच्या संचालक मंडळातही निवडून आले होते. या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने आपले विजयाचे खाते उघडले आहे.

    दरम्यान, आज छाननीच्या नंतर दुध संघातील लढतींचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले आहे. आता माघारीच्या कालावधीत काही उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. यानंतरच खरेच चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र या निवडणुकीतील पहिली बाजी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसने व अर्थातच एकनाथराव खडसे यांनी मारल्याचे दिसून आले आहे.