जळगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गणपती विसर्जनावेळी लेझीमच्या तालावर धरला ठेका

यावर्षी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जळगाव पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी या उत्सवात आनंदाने सहभागी झाले होते.

    जळगाव : जळगाव  (Jalgaon)महानगरपालिकेतर्फे दरवर्षी गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा केला जातो. गेली दोन  कोरोनामुळे (Corona) कुणालाही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करता आला नाही. मात्र यावर्षी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जळगाव पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी या उत्सवात आनंदाने सहभागी झाले होते.

    यावेळी महापौर जयश्री महाजन, महापौर कुलभूषण पाटील ,आयुक्त विद्या गायकवाड यांनी विसर्जनावेळी लेझीमच्या तालावर ठेका धरला. दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा करायला मिळण्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.