जळगाव निवडणूक : दोन लाखांहून अधिक मतदार बजावणार मतदान हक्क; १४० पैकी १२२ ग्रा.पं.च्या ४२१ केंद्रांवर उद्या निवडणूक

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगातर्फे सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) १४० ग्रा.प. साठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

  जळगाव : जिल्ह्यात १४० ग्रामपंचायतीसाठी (Grampanchayat Elections) सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येत आहे. रविवार १८ डिसेंबर रोजी १४० पैकी १२२ ग्रा. पं. सकाळी ७.३० ते ५.३० वाजेदरम्यान निवडणुकीसाठी २ लाख १५ हजार ६२९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

  ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगातर्फे सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) १४० ग्रा.प. साठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. १४० ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रा.प. बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १२२ ग्रामपंचायत क्षेत्रात ४२१ मतदान केंद्रावर आज रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

  दोन लाखांहून अधिक मतदार करणार मतदान

  जिल्ह्यातील बिनविरोध १८ ग्रामपंचायत वगळता १२२ ग्रामपंचायत क्षेत्रात ४२१ मतदान केंद्रावर आज मतदान केले जात आहे. या निवडणुकीत २ हजार १७९ सदस्य तर ३७६ सरपंच पदासाठी उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत आहेत.
  १२२ ग्रामपंचायत अंतर्गत २ लाख, १५ हजार, ६२९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

  सर्वात जास्त रावेर ६७ तर सर्वात कमी बोदवड, चोपड्यात १३ मतदान केंद्र

  जिल्ह्यातील बिनविरोध ग्रामपंचायत वगळता १२२ ग्रामपंचायत क्षेत्रात जळगाव १० ग्रा.पं.च्या ३०, जामनेर ११ ग्रा.पं.त ३४, धरणगाव ७ ग्रा.पं.त २०, एरंडोल ५ ग्रा.पं.त १५, पारोळा ५ ग्रा.पं.त१५, भुसावळ च्या ६ ग्रा.पं.च्या २२, मुक्ताईनगर २ ग्रा.पं.त १५, बोदवड ५ ग्रा.पं.च्या १३, यावल ८ ग्रा.पं.त ३५, रावेर १८ ग्रा.पं.च्या ६७, अमळनेर तालुक्यातील २० ग्रा.पं.तील ६३, चोपड्यात ५ ग्रा.पं.साठी १३, भडगाव तालुक्यात ६ ग्रा.पं.साठी २४ आणि चाळीसगाव तालुक्यातील १४ ग्रा.पं.क्षेत्रातील ४४ अशा ४२१ मतदान केंद्रावर दोन लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजवणार आहेत.

  या निवडणुकीसाठी १५०० मतदान केंद्राध्यक्ष सहायक अधिकारी कर्मचारी शनिवारी सकाळी मतदान साहित्य घेऊन नेमून दिलेल्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.