जळगाव ग्रामपंचायतीत भाजपचा विजय, मुलीच्या पॅनलचा मात्र पराभव, गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांला धक्का

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर संघातील मोहाडी ग्रामपंचायतीची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल होते.

    जळगाव : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर संघातील मोहाडी ग्रामपंचायतीची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल होते. परंतू त्यांचे पॅनल राष्ट्रवादी पुरस्कृत होते. या निवडणुकीत भाविनी पाटील यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे.

    नऊ पैकी तीन सदस्य निवडून आले असून भाविनी पाटील यांचा विजय झाला आहे. तर सर्वाधिक जागा भाजप पुरस्कृत पॅनलच्या निवडूण आल्या आहेत.

    भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय
    मोहाडी ग्रामपंचायतीवर गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल उभे होते. गेल्या पंचवार्षिक मध्ये त्या मोहाडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. यंदाच्या निंवडणुकीत त्यांच्याविरोधात प्रा. शरद पाटील यांचे पॅनल उभे होते. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता.

    निवडणूक अत्यंत चुरशीची झाली
    ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. निवडणुकीमध्ये भाविनी पाटील या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणात होत्या. त्यांच्या पॅनलमधील सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला. पॅनलमधील फक्त तीन सदस्य निवडून आले आहेत. मोहाडीच्या सरपंचपदी चंद्रकला रघुनाथ कोळी या भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यांच्या पॅनलचे 6 उमेदवार विजयी झाले.

    सगुणा पाटील ईश्वर चिठ्ठीने विजयी
    जळगाव तालुक्यातील कुवारखेडे ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक 3 अ मध्ये कल्याणी बाविस्कर विरुद्ध सगुणा पाटील या उमेदवारांना प्रत्येकी 55 मते मिळाली. ईश्वर चिठ्ठीने सगुणा पाटील या ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्या.

     मुलीच्या पॅनलचा मात्र पराभव
    भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा विजय होईल, अशी चर्चा होती. पंरतू मंत्री गिंरीश महाजन यांनी या ग्रामपंचायतीवर विशेष लक्ष देऊन गावची सत्ता भाजप पुरस्कृत पॅनलकडे खेचून आणली. यात भाविनी पाटील व त्यांच्या पॅनलमधील अन्य दोन असा तिघांचा विजय झालेला आहे.