
रस्ता रोको आंदोलनाच्या वेळी लोकांनी सरकारच्या विरोधात अनेक घोषणा केल्या.
जालना : जालन्यामधील मराठा समाजाचे सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यामुळे अनेकांनी या घडलेल्या घटनेला विरोध देखील केला आहे. आज मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळावे यासाठी जालनामधील लोकांनी आंदोलन केले होते. याचदरम्यान पोलिसांनी आंदोलकांना लाठीचार्ज केला. लाठीचार्ज या संदर्भात चांदवड तालुक्यातील सकल मराठा समाज यांनी गणुर चौफुली येथे चांदवड मनमाड राज्य महामार्ग या ठिकाणी अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले आणि शासनाचा निषेध करण्यात आला. या रस्ता रोको आंदोलनाच्या वेळी लोकांनी सरकारच्या विरोधात अनेक घोषणा केल्या.
यावेळी हा मोर्चा चांदवड शासकीय विश्रामगृह येथून कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर बसले होते. यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मोर्चेकरी हे आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही बसलो आहोत असे घोषणाबाजी देत शासनाचा विरोध केला. या मोर्चाचे सूत्रधार माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जालना येथे मराठा समाजाची काही मंडळी २९ ऑगस्टपासून मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाला बसले होते. राज्याच्या गृहखात्याने काल मोठा प्रकार घडवला. आंदोलन करणं हा भारताच्या संविधानाने दिलेला हक्क आहे. सदिच्छ मार्गाने जर आंदोलन करत असेल तर त्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही असे शिरीष कोतवाल म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मराठा समाजाप्रती सरकारमध्ये बसलेल्या मंडळींना प्रचंड मोठा राग आहे आणि त्यांनी जे कालचे आंदोलन अमानुषपणे दाबण्याचा प्रयत्न केला. वृद्धांना तरुणांना प्रचंड मारलं त्यामुळे चांदवड गावामधील काही तरुणांनी सकाळी ठरवलं की आपण त्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. ज्यांनी मारझोड करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या बांधणीसाठी आम्हीही खऱ्या अर्थाने रस्त्यावर आलो होतो. जेव्हा जेव्हा मतदानाची वेळ येते त्यावेळेला मराठा समाज हवा असतो तेव्हा त्यांना हिंदू आठवतात. जेव्हा त्यांना मदत करण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र ते मदत करताना दिसत नाहीये असे शिरीष कोतवाल म्हणाले.