जालना जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचाराचा निषेध, माथाडी कामगार कामे बंद ठेवून करणार आंदोलन

माथाडी कामगार निषेध व्यक्त करण्यासाठी पूर्णपणे माथाडी कामगारांची कामे बंद ठेवून आंदोलन करेल.

    आंदोलकांवर लाठीचार : मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचारा विरोधात माथाडी कामगारांचे निषेध आंदोलन निषेधार्थ नवी मुंबईतील वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज आणि माथाडी कामगारांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे कोणते मोठे षडयंत्र आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास माथाडी कामगार काम बंद आंदोलन करेल असा इशारा देखील सरकारला देण्यात आला. आंदोलकांवर झालेल्या लाठीचाराच्या प्रकरणात अनेकजण आवाज उचलत आहेत.

    यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले, मुंबई पोलीस आयुक्तालयामधून एसीपी साहेबांना आम्ही निवेदन दिले आहे. आता अपेक्षित आहे की गृहविभागाला ते ताबडतोब फोटो काढून ते पाठवून देतील आणि अपेक्षित हे पण आहे ज्यांनी लाठीमार केला आहे त्याचा अहवाल लवकरात लवकर येऊन त्याच्यावर कारवाई होईल आणि जर अहवालाला उशिर झाला किंवा कारवाई योग्य झाली नाही तर नक्कीच माथाडी कामगार निषेध व्यक्त करण्यासाठी पूर्णपणे माथाडी कामगारांची कामे बंद ठेवून आंदोलन करेल.

    पुढे ते म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये आमचे मराठा आंदोलन करते मनोज जरंगे पाटील यांच्यावरती काल ज्यापद्धतीने हल्ला झाला त्या हल्ल्याचा पहिले आम्ही निषेध करतो. राज्याची पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी होती की एखाद्या आंदोलनकर्त्यांनी जर त्याची जीभ जरी घसरली असेल तर त्याला समजून सांगून प्रेमाने त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना योग्य औषध पाणी करणं गरजेचं होत. काल ज्या काही मी क्लिप्स बघितल्या की त्यांना जबरदस्तीने त्या आंदोलनकर्त्याना मंडपातून उधळून लावण्याचं काम पोलीस यंत्रणेने केलेलं आहे असे नरेंद्र पाटील म्हणाले.