१ सप्टेंबर २०२३ पासून जायकवाडी धरणात डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडणार – आमदार राजेश टोपे

जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडावे अशी मागणी आ.राजेश टोपे यांनी केली.

    जालना – जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडावे याबाबत जायकवाडी कालवा समितीचे सदस्य आमदार राजेश टोपे यांनी या भागातील लोक प्रतिनिधी म्हणून बैठक घेतली. धरणात सध्या ३३% पाणी उपलब्ध आहे. यामधून संपूर्ण वजावट करून खरीप पिकाला पाणी देण्यासाठी २०२ एम.एम.क्यू. पाणी उपलब्ध असल्याचे आमदार राजेश टोपे यांनी सांगितले. यानुसार १ सप्टेंबर २०२३ रोजी रोटेशन सोडण्यात येणार असल्याचे आ. राजेश टोपे यांनी सांगितले.

    हे रोटेशन २५ दिवस चालणार असून जवळजवळ १८० एम.एम.क्यू पाण्याचा वापर होणार आहे. खरीप संपल्यानंतर २० द.ल.घ.मी.पाणी राहिल्यास रब्बीमध्ये पाणी देणे शक्य होणार नाही. एम.डब्लू.आर.आर.ए. २००५ च्या कायद्यानुसार ११ अन्वये सी प्रमाणे १५ ऑक्टोबरमध्ये जी जायकवाडी धरणाची स्थिती असते. त्या स्थितीनुसार वरच्या धरणातून पाणी सोडण्याची तरतूद आहे. त्यानुसार पाणी सोडण्यात यावे. त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडावे अशी मागणी आ.राजेश टोपे यांनी केली.

    जायकवाडी धरणाच्या वरील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. निळवंडे १००%, भंडारदरा १००%, नांदूरमधमेश्वर १००%, पुणेगाव ८८%, दारणा ९३%,मुकणे ७७%, वाकी ६१%,भाम, भावली व बालदेवी तिन्ही धरणात १००% पाणीसाठा आहे. वरील धरणातून १५ ऑक्टोबरची स्थिती बघून ६५% पेक्षा जर जायकवाडी धरणाचा साठा कमी असल्यास वरील धरणातून पाणी सोडावे.