सरकारकडून पाठवलेल्या GRमध्ये सुधारणेसाठी मनोज जरांगे ठाम; सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी, शिष्टमंडळ जाणार मुंबईला

  Jalna Maratha Kranti Morcha : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटले. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. विरोधी पक्षातील नेत्यांनीसुद्धा या आंदोलनाला भेट देऊन, सरकारच्या लाठीचार्जवर जोरदार टीका केली होती.

  मनोज जरांगे यांच्याशी सरकारची चर्चा
  यानंतर सरकारने मनोज जरांगे यांच्याशी वारंवार चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरूच ठेवले. पहिल्या दोन बैठकी झाल्यानंतर सरकारने यांनी वंशावळीत ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल, त्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ठरवले होते. परंतु, मनोज जरांगे यावर समाधानी नसल्याचे पाहायला मिळाले, त्यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती.

  मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी
  आज सरकारकडून अर्जुन खोतकर हे GR घेऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना GR वाचून दाखवला परंतु यावर मनोज जरांगे यांनी सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वंशावळीनुसार कुणबी प्रमाणपत्र न देता, सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. यासाठी पाहिजे तर आमचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईसुद्धा जाईल, असेही आश्वासन त्यांनी सरकारला दिले.

  अर्जुन खोतकर यांनी पाण्याचा ग्लास घेऊन यावा
  मनोज जरांगे यांनी अर्जुन खोतकर यांचा भाऊ असा उल्लेख करीत, आता भाऊंनी गोड बातमी आणून सोबत पाण्याचा ग्लास आणावा, मग मी उपोषण सोडतो, असे सरकारला आश्वासनसुद्धा दिले. माझे उपोषण सोडण्यासाठी सरकारने एवढी चांगली बातमी द्यावी, मग मी आंदोलन सोडतो.

  महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळणार आहे, शिंदे साहेबांची चुणूक आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, मराठ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. आमचे शांततेचे आंदोलन, पाठिंबा द्यावा परंतु लोकशाही मार्गाने, समाजाला न्याय मिळाला पाहिजे,