टिळक भवन येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार संपन्न, जनतेसाठी काँग्रेस पक्ष सदैव तत्पर – गायकवाड

शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार संपन्न झाला. शिक्षण विभागाशी संबंधित सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी ऐकून घेतले, त्यावर तात्काळ कार्यवाही करून ते प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दरम्यान, आगामी काळात सुद्धा जनता दरबार अशाच पद्धतीने सुरु राहिल असं यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

    मुंबई : काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहिला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचे जनता दरबार पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार संपन्न झाला. शिक्षण विभागाशी संबंधित सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी ऐकून घेतले, त्यावर तात्काळ कार्यवाही करून ते प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

    दरम्यान, आगामी काळात सुद्धा जनता दरबार अशाच पद्धतीने सुरु राहिल असं यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष कानडे, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, चंद्रकांत पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे, समन्वयक रविंद्र परटोले आदी उपस्थित होते.