
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळात अनेक विधानं करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर आता विद्यमान राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी केलेले विधान चर्चेचा विषय बनले आहे. कारण राज्यपाल बैस यांनी जंजिरा किल्ल्याबाबत बोलताना एक विधान केले. 'बाजीराव पेशव्यांनी जंजिरा सिद्धी जोहरच्या ताब्यातून मुक्त केला', असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळात अनेक विधानं करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर आता विद्यमान राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी केलेले विधान चर्चेचा विषय बनले आहे. कारण राज्यपाल बैस यांनी जंजिरा किल्ल्याबाबत बोलताना एक विधान केले. ‘बाजीराव पेशव्यांनी जंजिरा सिद्धी जोहरच्या ताब्यातून मुक्त केला’, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यपाल रमेश बैस एका कार्यक्रमात बोलत होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘बाजीराव पेशव्यांनी जंजिरा किल्ला हा सिद्धी जौहरच्या तावडीतून मुक्त केला. तर बाजीराव पेशवे यांचे वीरतेला आपण विसरू शकत नाही. त्यांनी अनेक युद्ध जिंकले आणि गुजरातमध्येही मराठा साम्राज्य स्थापन केले. त्यांनी जंजिराला सिद्धी जौहरच्या ताब्यातून मुक्त केले. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे की, त्यांनी देशाला नेतृत्व दिले आहे. महाराष्ट्रातील वीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी देशाच्या स्वातंत्रलढ्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले’.
इतिहास अभ्यासक म्हणतात…
याबाबत इतिहास अभ्यासक विश्वास पाटील म्हणाले की, ‘जंजिरा हा किल्ला अजिंक्य राहिला आहे. तो स्वराज्यात कधीही आला नाही, शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी झाले. सिद्धीच्या ताब्यातून बाजीराव पेशव्यांनी कधीही हा किल्ला जिंकला नाही. हा किल्ला नेहमी अजिंक्य राहिला आहे. शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकता आला नाही, म्हणून त्यांनी बाजूला पद्मदुर्ग बांधला. संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी पाण्यात सेतू बांधून प्रयत्न केला. मात्र, तेव्हा औरंगजेब मिनवायला आल्यामुळे त्यांना तो किल्ला सोडून द्यावा लागला’.
330 वर्षे किल्ला अजिंक्य
‘बाजीराव पेशव्यांनी जंजिरा किल्ला हा सिद्धीच्या तावडीतून मुक्त केला. मात्र, हा किल्ला 1617 ते 1947 अशी 330 वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला आहे. त्यामुळे चुकीचा इतिहास सांगितला म्हणून राज्यपाल बैस चर्चेत आले आहेत.