जरांगे पाटलांचा सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम; 22 ऑक्टोबरला मराठ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार

मराठा बांधवांना आरक्षण दिलं नाही तर 40 व्या दिवशी समजेल मराठा काय आहे तो. तसंच, 22 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आणि त्यानंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील, अशा भाषेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

  जालना: मराठा समाजासाठी आज सुवर्ण क्षण आहे. आणखीन फक्त 10 दिवस. आम्ही तुम्हाला दिलेले 40 दिवस संपत आलेत. त्यामुळे जर मराठा बांधवांना आरक्षण दिलं नाही तर 40 व्या दिवशी समजेल मराठा काय आहे तो. तसंच, 22 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आणि त्यानंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील, अशा भाषेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
  जरांगे पाटलांच्या मागण्या काय आहेत ?
  सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा
  .
  कोपर्डीच्या बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी
  मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी, सरकारी नोकरी द्यावी
  दर 10 वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा, आणि प्रगत जाती बाहेर काढाव्यात
  PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावावेत
  …तर सरकार जबाबदार राहील
  केंद्र सरकार अन् राज्य सरकारने मराठ्यांचे हाल करू नयेत. आमचा ओबीसीत समावेश करा. दहा दिवसांपेक्षा अधिक काळ वाट पाहण्याची आमची तयारी नाही,” असा सज्जड दम जरांगेंनी सरकारला दिला. “22 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आणि त्यानंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील,” असे ठामपणे जरांगेंनी सांगितले.