
सातारा : मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे साताऱ्यात शनिवारी जल्लोषी स्वागत करण्यात आले . मराठा समाज आरक्षणासाठी सुरू असलेल्या जरांगे यांच्या दौऱ्यामध्ये जरांगे पाटील यांनी सभा होण्यापूर्वी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण स्थळाला भेट दिली त्यावेळी आयोजकांच्या वतीने जरांगे यांचे स्वागत करून क्रेनच्या द्वारे त्यांना मोठा हार घालण्यात आला
लढा तीव्र करण्यासाठी जरांगे पाटील यांचे राज्यव्यापी दौरे सुरू
या भेटीदरम्यान आयोजकांनी आरक्षणासाठी साताऱ्याची दोन्ही राजे आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी जरांगे पाटील यांचे राज्यव्यापी दौरे सुरू आहेत. शनिवारी कराड येथून जरांगे पाटील यांचे साडेबारा वाजता सातारा शहरात आगमन झाले गांधी मैदानावर सभेला जाण्यापूर्वी त्यांनी शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जिल्हाधिकारी कार्यालयावरील उपोषण स्थळाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांचे मला मोठा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतिषबाजी यावेळी करण्यात आली. उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आयोजकांनी सातारा जिल्ह्यातील आंदोलनाची माहिती जरांगे पाटील यांना दिली
जरांगे पाटलांनी घेतली दोन्ही राजांची भेट
सभा झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. उदयनराजे व जरांगे पाटील या दोघांनीही आरक्षणासंदर्भात मराठ्यांनी एकी राखावी, असे हात जोडून कळकळीची विनंती केली. आरक्षणाचा लढा यापुढेही असाच अखंड सुरू राहणार असल्याचे आश्वासन जरांगे पाटील यांनी दिले आहेत. त्यानंतर जणांनी पाटील यांनी सुरुची येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली.
पुष्पवृष्टी करून जरांगे पाटलांचे स्वागत
यावेळी मराठा समाजाच्या समन्वयक समितीच्या सदस्यांनी जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी केली साताऱ्यात जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती गांधी मैदानावर भगवे झेंडे लावून संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते .ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले