जावली बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी – माजी चेअरमन, योगेश गोळे

दत्तात्रय महाराज कळंबे जावली सह. बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेस सुरवात झाली आहे. सदरची बँक ही वै. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या अध्यात्मिक विचारांनी प्रेरित असून सदरची निवडणूक ही सर्व नेते मंडळींनी एकत्र येवून बिनविरोध करावी, अशी अपेक्षा माजी चेअरमन योगेशजी गोळे यांनी व्यक्त केली आहे.

    मेढा : दत्तात्रय महाराज कळंबे जावली सह. बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेस सुरवात झाली आहे. सदरची बँक ही वै. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या अध्यात्मिक विचारांनी प्रेरित असून सदरची निवडणूक ही सर्व नेते मंडळींनी एकत्र येवून बिनविरोध करावी, अशी अपेक्षा माजी चेअरमन योगेशजी गोळे यांनी व्यक्त केली आहे.

    आजतागायत मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या सारख्या ठिकाणी सर्वसामान्य जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा ह्या ठिकाणी काम करणाऱ्या कष्टकरी, कामगार, नोकरदार, उद्योजक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहाणारी ही एकमेव आर्थिक संस्था आहे. आजतागायत सुसंस्कृत विचारांची पाठराखण करणाऱ्या मंडळींनीच संस्थेचे विश्वस्थ. या नात्याने कळंबे महाराजांच्या नैतिक विचाराने संस्थेचा कारभार केला होता.

    मागील संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये. दुर्देवाने कळंबे महाराजांचा नैतिक विचार सांभाळणाऱ्या आम्हामंडळीचा निसटता पराभव झाला व अविचारी नेतृत्वाला संस्थेच्या प्रत्यक्ष कारभारामध्ये हस्तक्षेप करण्यास संधी मिळाली. याचा दुरगामी परिणाम हा संस्थेच्या कामकाजावर दिसून येत आहे. हे दुर्देव होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत संस्थेची (बॅकेची) आर्थिक स्थिती पाहाता बँकेला हि निवडणूक परवडणारी नाही हे स्पष्ट आहे. अशा परिस्थीतीत महाराजांच्या नैतिक विचाराची पाठराखण करणारी मंडळी हि संचालक मंडळावर निवडूण अथवा बिनविरोध यावेत हि अपेक्षा सर्वसामान्य सभासदांची आहे.
    आज पर्यंत महाराज असताना व महाराजाच्या पश्चात जावली, महाबळेश्वर, वाई, तालुक्यातील अनेक राजकिय नेतृत्व सांभाळणाऱ्या नेत्यांनी स्वतःचे वेंक्तीगत व राजकिय जोडे संस्थेच्या बाहेर ठेवून संस्थेची पाठराखण केली आहे. परंतु या उपर कधीही संस्थेत ढवळाढवळ केलेली नाही. यामध्ये सर्वच वेगवेगळ्या पक्षाचे माजी आमदार, खासदार, मंडळींचा सहभाग आहे. अशा परिस्थीतीत काचेच्या भांडयाचे. स्वरूप असणाऱ्या. आर्थिक संस्थेला कोणताही तडा जाता कामा नये. ही आमची प्रामाणिक ईच्छा आहे. त्याच प्रमाणे भविष्यात बँकेची प्रगती होवून बॅंकेस शेड्युल दर्जा मिळवा आणि सर्वसामान्य सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचे हित साधले जावे हिच प्रामाणिक इच्छा आहे असे मत योगेश गोळे यांनी व्यक्त केले आहे.

    अशा परिस्थीतीत येवू घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ही निवडणुक बिनविरोध व्हावी ह्यासाठी . योग्य सन्माननीय तोडगा वरिष्ठांनी काढावा अशी इच्छा गोळे यांनी व्यक्त केली आहे. तथापी सर्व विचारांना एकत्रित घेवून जरी निवडणूक लागली तरी कै. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या विचारांची पाठराखण करणारी संगठना म्हणून या निवडणूकीस सामोरे जावे. या निवडणुकीद्वारे कै. दत्तात्रय महाराज कळंबे यांचा विचार व त्यांची संस्था हि मजबूत करून उत्तरोत्तर प्रगती करेल असा अशावाद गोळे यांनी व्यक्त केला आहे.