कळमदरे येथील जवान अर्जुन गांगुर्डे शहीद

चांदवड तालुक्यातील कळमदरे गावचे भूमिपूत्र अर्जुन लुकाराम गांगुर्डे (५०) हे ओडीसा राज्यातील राऊरकेला येथे केंद्रीय अाैद्याेगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कर्तव्य बजावत असताना गुरुवार (दि. ९) रोजी शहीद झाले. या घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली होती.

    चांदवड :  चांदवड तालुक्यातील कळमदरे गावचे भूमिपूत्र अर्जुन लुकाराम गांगुर्डे (५०) हे ओडीसा राज्यातील राऊरकेला येथे केंद्रीय औद्याेगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कर्तव्य बजावत असताना गुरुवार (दि. ९) रोजी शहीद झाले. या घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली होती.

    तालुक्यातील कळमदरे येथील शेतकरी कुटुंबियात गांगुर्डे कुटुंबात अर्जुन यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अर्जुन यांना देशसेवा करण्याची आवड होती. सन १९९१ साली ते केंद्रीय औद्याेगिक सुरक्षा दलात भरती झाले तेव्हापासून ते आजतागायत अर्जुन गांगुर्डे यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे. आज जवळ्पास ३१ वर्ष त्यांनी देशसेवा केली असून ७ वर्षे सर्व्हिस बाकी होती.

    गुरुवारी नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावत असताना कॉन्स्टेबल अर्जुन गांगुर्डे यांना वीरमरण आले. या घटनेची वार्ता समजताच संपूर्ण गावासह तालुक्यात शोककळा पसरली होती. वीर जवान अर्जुन गांगुर्डे यांच्या पश्चात पत्नी पुष्पा, मुलगा रोहन, मुलगी शिवानी असा परिवार आहे. गांगुर्डे यांचा मृतदेह शनिवार (दि.११) रोजी सायंकाळपर्यंत चांदवडला पोहचणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.