Jayant Patil
Jayant Patil

  नागपूर : महाराष्ट्रातील बलात्काराच्या घटनेत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. बलात्काराच्या (Rape Cases) घटनेत आपले राज्य चौथ्या क्रमांकावर आहे सत्ता राहिली तर लवकरच पहिल्या क्रमांकावर आहे. ⁠महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सध्या देशात भारतात पहिल्यादांच राम अवतरत आहे की काय असे वातावरण आहे. रामावर एवढंच प्रेम असेल तर सीतामाई संरक्षण करा, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. वाढत्या महिला अत्याचारावर चिंता व्यक्त करताना ड्रग्जच्या प्रकरणावरदेखील टिप्पणी केली आहे. सध्या उडता पंजाब, उडता महाराष्ट्र झालाय, असेही त्यांनी सांगितले.

  गुन्हा दाखल झाला तर तपास करायचा

  जयंत पाटील म्हणाले, राज्यात कायदा सुवस्था बिघडली आहे. बिहार राज्याला आपण बोलायचो आता आपल्या राज्यात ती स्थिती आली आहे. घटना घडली तर गुन्हा दाखल करायचा नाही. गुन्हा दाखल झाला तर तपास करायचा नाही, ⁠अशी परिस्थिती आहे. सध्या उडता महाराष्ट्र झाला आहे. ललित पाटील प्रकरणात मंत्री त्याला अॅडमिट करतो नंतर त्याला पळून जायला मदत करतो . ही गुन्ह्याची स्थिती आहे.

  एक फोडला आता दुसरा पक्ष फोडता सर्वांना एकाच पक्षात घ्या, जयंत पाटलांची टीका
  बीड जाळपोळ प्रकरणावर देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये घटना घडली त्यावेळी एसपी बीड आणि माझलगाव या ठिकाणी ते नव्हते. ⁠ते फोन बंद करुन बसले होते अशी मला माहीती मिळाली. जिल्हाधिकारी यांच्या अहवालात यांचा उल्लेख आहे ⁠कोणाचा पाठिंबा असल्याशिवाय अस होऊ शकत नाही, असे जयंत पाटील म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीवर देखील जयंत पाटलांनी टिप्पणी केली आहे. जयंत पाटील म्हणाले, एक फोडला आता दुसरा पक्ष फोडता सर्वांना एकाच पक्षात घ्या.

  जनतेची फसवणूक सुरू आहे : जयंत पाटील
  आपलं सरकार नोटा छापण्याच काम करत आहे. पुरवण्या मागण्या मोठ्या जाहीर करण्यात आल्या. एक लाख साठ हजार आता राज्याला लागणार आहेत. हे पैसे कुठे गेले तर ते आमदारांच्या कामासाठी निधी देण्यात आलं. सिचन प्रलंबित योजना राज्यात मोठ्या प्रमाणात आहेत. आमचं सरकार गेल्यावर यांनी काहीच केलं नाही. फडणवीस तुटीचा बजेट मांडतात, दुसरीकडे एक लाख कोटी पुरवणी मागण्या आहेत. आमदरांना काही कोट्यावधी रूपये काम दिले, निधी नाही नियोजन नाही जनतेची फसवणूक आहे.