गुवाहाटीला गेलेले शिवसेना आमदार परत आले तर… जयंत पाटील यांचे ठाकरे सरकारबाबत मोठं वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धक्कादायक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील या सर्व प्रकरणावर मोठ वक्तव्य केले आहे(Jayant Patil's big statement about Thackeray government).

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धक्कादायक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील या सर्व प्रकरणावर मोठ वक्तव्य केले आहे(Jayant Patil’s big statement about Thackeray government).

    शिवसेनेचे जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा काढून घेतला नाही. त्यांनी पक्ष सोडण्याचीही भाषा केली नाही. ते मुंबईला परत आले आणि चर्चा झाली तर पुढचं ठरेल असं जयंत पाटील म्हणाले.
    संजय राऊत यांनी महाविकास आघाडून बाहेर पडण्याबाबत केलेलं विधान अंतर्गत चर्चा करून केलं असेल, त्यामुळे बघू काय होईल असेही ते म्हणाले.

    शिवसेनेचा इतिहास आसा आहे की ज्यांनी पक्ष सोडला ते निवडणुकीत हरले. कार्यकर्ते हे पक्षाचे असतात ते नेत्यांना फार काळ साथ देत नाहीत. बहुमत टिकवण्यासाठी काहीतरी निर्णय घेतला जाईल अस देखील जयंत पाटील म्हणाले.

    वर्षा सोडून मातोश्रीवर जाणं हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे. मात्र आजही ते मुख्यमंत्री आहेतच असंही जयंत पाटील यांनी सांगीतले.