गुवाहाटीमध्ये गेलेल्या आमदारांबाबत जयंत पाटील यांच खळबळजनक विधान, म्हणाले…

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारला (MVA) आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. एकीकडे शिवसेनेकडून या आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

    मुंबई : सुरतमधून (Surat) शिवसेना आमदार (Shivsena MLA) गुवाहाटीला (Guwahati) पोहोचल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारला (MVA) आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. एकीकडे शिवसेनेकडून या आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

    जयंत पाटील नेमकं काय म्हणाले ?

    गुवाहाटीत दाखल झालेले शिवसेनेचे सगळेच आमदार हे बंडखोर नसून त्यातील काही आमदार हे गुप्तहेर असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली.

    या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी काही महत्वपूर्ण खुलासे केले आहेत. त्यातील एक मोठा खुलासा म्हणजे गुवाहाटीत दाखल झालेले शिवसेनेचे सगळेच आमदार हे बंडखोर नसून त्यातील काही आमदार हे गुप्तहेर आहे. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पडू नये, यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रावादी काँग्रेस पूर्णपणे मदत करणार आहेत. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या बंडाची कारणं आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादाची आम्हाला माहिती नाही, असं ही त्यांनी स्पष्ट केलं.

    बंडखोरी केलेले आमदार आज ना उद्या परत येतीलच शिवसेना आमदार परतले की चित्र अधिक स्पष्ट होईल. त्यानंतरही आम्ही शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं. गेलेले आमदार परत येतील, असा विश्वास आम्हाला आजही वाटतोय. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जी साद घातली आहे, त्याला सकारात्मक प्रतिसाद सर्व आमदार देतील, अशी खात्री आम्हाला वाटतेय, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.