जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष प्रा.शरद पाटील यांचे निधन; एकेकाळी प्रकाश जावडेकर यांना केलं होतं पराभूत

पुणे पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार व जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील (Prof. Sharad Patil) यांचे बुधवारी निधन झाले. अत्यंत साधेपणानं जीवन जगणाऱ्या पाटील यांनी सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना जनता दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर काम केले.

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पुणे पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार व जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील (Prof. Sharad Patil) यांचे बुधवारी निधन झाले. अत्यंत साधेपणानं जीवन जगणाऱ्या पाटील यांनी सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना जनता दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर काम केले.

    प्रा. शरद पाटील यांनी 10 वर्षे विधानसभा व 6 वर्षे विधानपरिषदेच्या माध्यमातून सभागृहात  अनेक प्रश्नांना वाचा फोडली. पुरोगामी विचारांशी ठाम राहून त्यांनी नेहमी चळवळींना पाठींबा दिलेला होता. प्रा. शरद पाटील हे जनता दलाच्या तिकिटावर महाराष्ट्राच्या विधानसभेत मिरज विधानसभा मतदारसंघातून 1990 आणि 1995 मध्ये विजयी झाले होते. या दोन टर्ममध्ये त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नांना वाचा फोडली.

    यानंतर विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून शरद पाटील यांनी निवडणूक लढवली. 2002 मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पाटील यांनी भाजपचे दिग्गज नेते प्रकाश जावडेकर यांना पराभूत केलं होतं. प्रकाश जावडेकर यांना पराभूत करत ते जाएंट किलर ठरले होते.