सोन्याच्या जेजुरीगडाला मिळणार पुन्हा ऐतिहासिक झळाळी; अर्थसंकल्पतील मंजुरीमुळे पहिला टप्प्याची कामे वेगाने सुरू

  जेजुरी : भारतीय लोकदैवत असलेल्या आणि सोन्याची जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा मंदिर गडकोटास सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या स्थापत्य बांधकाम शास्त्राची पुन्हा झळाळी गडाचे गतकालीन वैभव पुन्हा झळकणार गडकोट भिंती अंतर्गत दगडी कामाला सुरवातही करण्यात आली आहे. याकरिता राज्य शासनाच्या पुरातत्व विभागकडून कामना वेगही आला असून, मंदिराच्या गर्भगृहातील काम अंतिम टप्यात आले आहे.

  349 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी

  तीर्थक्षेत्र जेजुरीकरिता सुमारे 349 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधीही सण 2021-22 च्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली असून, त्यानुसार जेजुरी गडाच्या पहिल्या टप्प्याचे कामही कार्यान्वित झाले आहे. सुमारे तीनशे वर्षांनंतर एवढ्या मोठ्या निधीच्या माध्यमातून गड मंदिरे आणि परिसराचा जीर्णोद्धार होत असून, आपल्या कुलदैवतला पुन्हा जुन्या देखण्या स्वरूपाची झळाळी मिळणार असल्याचे समाधान जेजुरी ग्रामस्थ मानकरी गावकरी खान्देकरी, गुरव पुजारी सेवक कर्मचारी वर्गासह राज्यातील भविकांनी समाधान व्यक्त केले आहें.

  जीर्णोद्धारासह विकासकामांचा शुभारंभ

  या जीर्णोद्धारासह विकासकामांचा शुभारंभ जेजुरीत नुकत्याच झालेल्या ‘शासन आपल्या दारीं’ कार्यक्रमात राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या अनुमतीने गडावरील विकासकामांची अभ्यास पूर्ण सुरुवात केली आहे. सध्या गडाचा प्रथमदर्शनी भाग आतील रंगमहाल, ओवऱ्या दगडी मनोरे यांचे क्लिनींग करण्यात आले असून, गडाचे पूर्व वैभव मुलस्वरूपाचे देखणे वैभव हळूहळू दिसू लागले आहे.

  ऐतिहासिक वास्तू

  इतिहासकालीन सरदार मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी, शहाजी, मालोजीराजे महाराज,भोसले परिवाराच्या काळातील सुंदर देखण्या दीपमाळा गडकोटचा झालेला जीर्णोद्धार तत्कालीन गडमंदिर गाभारा सौदर्य पुन्हा एकदा उजळून जाणार आसल्याची किमया पुरातत्व विभाग प्रमुख वाहने साहेब तसेच अभ्यासक कारगिर करून घेत आहेत संपूर्ण आराखड्या नुसार संपूर्ण गडपरिसराचा तीन टप्यात करण्यात येणार असून प्रथम टप्पा एक मधून मंदिरं गाभारा पूर्ण तटबंदी जतन आणि दुरुस्ती करण्यात येणार असून याकरिता आकरा कोटी बावीस लाख 96हजार सातशे तेतीस रुपयांची तरतूद केली गेली आहें तर उर्वरित निधीतून मंदिरं गड लगत परिसरातील ऐतिहासिक वास्तू वस्तू तत्कालीन सोयसुविधा असलेला होळकर कालीन तलाव पेशवे कालीन तलाव छोटी मंदिरे जयाद्री डोंगर कडेपठार पायरी मार्ग इत्यादिचा समावेश आहें.

  ऐतिहासिक दगडाना मुलस्वरूप

  पुरातत्व विभागाने तंत्र कौशल्य साधने साहित्याचा वापर करीत ऐतिहासिक दगडाना मुलस्वरूप देण्याचा उत्तम प्रयत्न केला आहें या करिता विषष्ठ शैलीच्या दगदचाही वापर करण्यात येत असल्याचे प्रमोद चव्हाण यांनी सांगितले तर या कामाचे समाधानही नवनिर्वचित देवसंस्थान कमिटी अध्यक्ष पोपट खोमणे विश्वस्त डॉ राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, ऍड विश्वास पानसे ऍड पांडुरंग थोरवे , अभिजित देवकाते, आणि अनिल सौन्दडे तसेच गुरव पुजारी कोंळी घडशी वीर समाजाने ग्रामस्थ खान्देकरी मानकरी सेवकरी कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहें