पाकिस्तानी साखर विरोधी आंदोलना प्रकरणी, जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांपे यांची निर्दोष मुक्तता

ज्या गोदांमध्ये ही पाकिस्तानी साखर ठेवण्यात आली हाती. त्या गोदांमध्ये घुसून साखरेच्या गोणी फोडण्यात आल्या होत्या. या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड व माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह काही जाणांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.

    पाकिस्तानमधून आयात करण्यात आलेली साखर ठेवण्यात आलेले गोदाम फोडल्या प्रकरणी अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी एस. डब्ल्यू . उगले यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंंद्र आव्हाड आणि माजी खासदार आनंद परांपे यांची निर्दोष मुक्तता केली. केंद्र सरकारने पाकिस्तानातील साखर निर्यात केली होती. ती स्थानिक साखरेपक्षा किलोमागे एक रूपया स्वस्त दारान विकेली जात होती. त्याला शेतकर्‍यांचा विरोध होता. 14 मे 2018 रोजी या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.

    ज्या गोदांमध्ये ही पाकिस्तानी साखर ठेवण्यात आली हाती. त्या गोदांमध्ये घुसून साखरेच्या गोणी फोडण्यात आल्या होत्या. या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड व माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह काही जाणांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाचा खटला पनवेल येथील मुख्य न्याय दंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात सुरू होता. नंतर हा खटला अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला. या खटल्याच्या सुनावणीत दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मुख्य न्याय दंडाधिकारी एस. डब्ल्यू . उगले यांनी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात अ‍ॅड. प्रविण ठाकूर व अ‍ॅड. गणेश केळूस्कर यांनी आरोपींची बाजू मांडली.