अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

शंकरराव चव्हाण कट्टर काँग्रेसचे होते अशोक चव्हाण देखील कट्टर काँग्रेसचे होते. त्याच्यावर माझे विश्वास बसत नाही जे होत आहे ते दुर्दैवी आहे.

    अशोक चव्हाणांनी का राजीनामा दिला हे माहीत नाही, मात्र वाईट वाटतं ज्या घरात काँग्रेसने 1952 सालापासून मंत्रिपद दिलं मंत्रीपद महत्वाचं नाही त्यांचं घर काँग्रेसच्या विचाराचे होते. शंकरराव चव्हाण कट्टर काँग्रेसचे होते अशोक चव्हाण देखील कट्टर काँग्रेसचे होते. त्याच्यावर माझे विश्वास बसत नाही जे होत आहे ते दुर्दैवी आहे.

    सत्ताधारी पक्षांमध्ये असलेली स्पर्धा ही धोकादायक
    गणपत गायकवाड यांनी केलेले आरोप गंभीर आहेत, सत्ताधारी पक्षांमधील असलेली ही स्पर्धा आणखी धोकादायक आहे. निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला म्हणजे विद्रोहाचा आवाज जगू देणार आहेत की नाही. विद्रोहाचा आवाज तसाच दाबून टाकणार आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

    खासदार श्रीकांत शिंदे यांना इतिहास माहित नसावा
    खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत पाचशे वर्षात युगपुरुष जन्माला आला ते म्हणजे नरेंद्र मोदी असे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख नसावी, कर्तृत्वाची ओळख नसावी फुले शाहू आंबेडकरांची देखील ओळख नसेल इतिहास माहीत नसल्यामुळे अशा चुका होतात असा टोला त्यांनी लगावला.