anand dighe dispute

जितेंद्र आव्हाडांनी धर्मवीर आनंद दिघेंचा उल्लेख एकेरी आनंद दिघे असा केला, त्यांना धर्मवीर म्हणायला आव्हाडांना लाज वाटते का, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

    मुंबई: धर्मवीर आनंद दिघे ( Dharmveer Anand Dighe) यांना टाडाच्या आरोपांतून बाहेर येण्यासाठी, जामिनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मदत केल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. हे वक्तव्य करताना दिघेंचा उल्लेख केवळ आनंद दिघे असा केलाय. या एकूणच दाव्यावरुन शिंदे गटातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आनंद दिघेंना जामिनासाठी मदत करणारे पवार हे न्यायाधीश होते का, असा सवाल शिंदे गटाचे ठाण्यातील नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलाय. तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या प्रकरणात मौन धरुन गप्प का आहे असा सवाल मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) यांनी विचारला आहे.

    पवार न्यायाधीश होते का?- नरेश म्हस्के
    जितेंद्र आव्हाडांनी धर्मवीर आनंद दिघेंचा उल्लेख एकेरी आनंद दिघे असा केला, त्यांना धर्मवीर म्हणायला आव्हाडांना लाज वाटते का, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. पवारांमुळं जामीन मिळाला असा दावा आव्हाड करतायेत, तर त्यावेळी पवार हे न्यायाधीश होते का, असा सवालही म्हस्केंनी केलाय. शरद पवारांनीच दिघेंना जेलमध्ये टाकलं होतं का, याचं स्पष्टीकरणही आव्हाडांनी द्यावं अशी मागणी म्हस्केंनी केलीय.

    ठाकरे गटाचं मौन का ? शंभूराजे देसाईंचा सवाल
    जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य हे धर्मवीर आनंद दिघेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) असलेल्या ठाकरे गटानं याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे. मविआची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मविआत राहण्यासाठी आनंद दिघे यांचा अपमान सहन करण्यात येत असल्याची टीका त्यांनी ठाकरे गटावर केलीय. ठाण्याचे (Thane) खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना जवळून पाहिलं आहे, तेही या प्रकरणात मौन बाळगून का आहेत, असा सवालही विचारण्यात आलाय.