jitendra awhad

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी ट्विटद्वारे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यामागे सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Rashtrawadi Congress Party) नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. कारण एका बाईने जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडल्या प्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जितेंद्र आव्हाडांनी या संदर्भात ट्विटद्वारे (Jitendra Awhad Tweet) आपलं मत मांडलं आहे.

    जितेंद्र आव्हाड यांनी त्यावेळी आमदारकीचा राजीनामा देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे सुपूर्द केला होता. मात्र नंतर जितेंद्र आव्हाड यांना जामीनही मंजूर झाला होता. मात्र या सगळ्या घटनांच्या काळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. आता या सगळ्या प्रकारावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

    जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणतात की, “माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात ७२ तासांत दाखल करण्यात आले. उद्या गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात.”

    ते अन्य एका ट्विटमध्ये पुढे सांगतात की, “म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हात वर करून मोकळे होऊन जातील. ह्याच्यात काय करावे हे सुचत नाहीये. आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवा, कि ह्या वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी अर्थात त्यांचा काय दोष आदेश कुठून आले हे महाराष्ट्राला माहीत आहे.”