‘आपला बाप आजारी असताना आपण त्याच्याबद्दल अशी चर्चा करतो का ?’ मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीविषयी प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांबाबत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला राग

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा (Absence Of Chief Minister) मुद्दा आज दिवसभर अधिवेशनामध्ये चर्चेत राहिला. मात्र याच मुद्द्यावरुन चर्चा करणाऱ्या भाजपाला गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhads Reply To The Opposition Criticism) यांनी खडे बोल सुनावले आहेत. आजारपणावरुन चर्चा करणं हे विकृतपणाचं आहे असं आव्हाड यांनी म्हटले आहे.

    राज्यातील हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे(Absence Of Chief Minister Uddhav Thackeray) अनुपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा आज दिवसभर अधिवेशनामध्ये चर्चेत राहिला. मात्र याच मुद्द्यावरुन चर्चा करणाऱ्या भाजपाला गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhads Reply To The Opposition Criticism) यांनी खडे बोल सुनावले आहेत. आजारपणावरुन चर्चा करणं हे विकृतपणाचं आहे असं आव्हाड यांनी म्हटले आहे.

    दुपारी विधानसभेच्या सदनाबाहेर मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातील अनुपस्थितीबाबत पत्रकारांशी संवाद साधताना आव्हाड म्हणाले की, “विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण आहे. कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अर्धा, पाऊण तास बोलत होते,” असं सांगितलं.

    पुढे बोलताना, “मुख्यमंत्र्यांवर कोणत्याही विभागाची जबाबदारी नाही. ते संपूर्ण मंत्रीमंडळाचे नेते आहेत. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवानामध्ये येणार. ते अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानभवनात येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात राज्यात संभ्रम निर्माण करणं किंवा चर्चा करणं चुकीचं आहे,” असंही आव्हाड म्हणाले.

    “आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो काय? आपली ती संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. तो काय स्वत:हून नाटक करत नसतो. त्यामुळे या आजारपणाची चर्चा करणं हेच मला मुळात विकृतपणाचं, बालिशपणाचं लक्षण आहे,” अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली.