जितेंद्र आव्हाडांचा स्टंट त्यांच्याच अंगलट; राम शिंदे यांची टीका

चित्रपटाला मान्यता असल्यानंतर प्रदर्शित झालेला चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकाला मारहाण करणे कितपत योग्य आहे, असा सवाल करून जितेंद्र आव्हाड यांनी केलेला स्टंट त्यांच्याच अंगलट आला असल्याची टीका भाजपचे माजी मंत्री व बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी प्रा. राम शिंदे यांनी केली.

    बारामती : चित्रपटाला मान्यता असल्यानंतर प्रदर्शित झालेला चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकाला मारहाण करणे कितपत योग्य आहे, असा सवाल करून जितेंद्र आव्हाड यांनी केलेला स्टंट त्यांच्याच अंगलट आला असल्याची टीका भाजपचे माजी मंत्री व बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी प्रा. राम शिंदे यांनी केली. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या समवेत शिंदे बारामती दौऱ्यावर आले. यावेळी प्रा. त्यांनी संवाद साधला.

    कोणाच्याही सार्वभौमत्वावर गदा आणण्याचा व कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. मग तो आमदार असो वा माजी मंत्री असे म्हणत माजी आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचे समर्थन केले.

    प्रेक्षकांना मारहाण कोणत्या कायद्यात बसते ?

    यावेळी शिंदे म्हणाले, आपल्या देशात कायदा आहे. या कायद्याच्या अनुषंगाने सेंसर बोर्डाने ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला मान्यता दिली आहे. चित्रपटाला मान्यता असताना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण करणे कोणत्या कायद्यात बसते ?