राष्ट्रवादी कॉंग्रेस वैद्यकीय मदत कक्ष राज्यप्रमुखपदी जितेंद्र सातव

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ( अजित पवार गट) वैद्यकीय मदत कक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील जितेंद्र सातव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार सातव यांची नियुक्ती करण्यात आली.

    पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ( अजित पवार गट) वैद्यकीय मदत कक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील जितेंद्र सातव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार सातव यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सातव यांना नियु्क्ती पत्र देण्यात आले.

    सातव यांनी या पूर्वी शिवसेना ( शिंदे गट) वैद्यकीय सहायता कक्षात पुणे जिल्हा समन्वयक ते राज्य संपर्कप्रमखपदावर काम केले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आल्यानंतर सातव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सातव यांच्या वैद्यकीय मदत सेवेतील योगदानाची दखल घेत त्यांच्यावर थेट राज्यप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
    दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यात, तालुका व गाव पातळीवर वैद्यकीय मदत कार्य पोहचवणे. नागरिकांनी विविध वैद्यकीय मदत योजनांची माहिती करुन देणे यासह राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षात एक लाखपेक्षा अधिक सदस्य, आणि ५० हजारांपेक्षा अधिक पदाधिकारी, सहकारी जोडण्याचा निर्धार सातव यांनी केला आहे.